Rbi Resctricts Two Cooperative Banks: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील दोन सहकारी बँकांच्या कामकाजावर बंदी घातली आहे. दोन्ही सहकारी बँकांची ढासळलेली आर्थिक स्थिती पाहता रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे. या आदेशानंतर दोन्ही बँकांचे ग्राहक त्यांच्या खात्यातून पैसे काढू शकणार नाहीत. या सहकारी बँका कर्नाटकातील श्री मल्लिकार्जुन पाटणा सहकारी बँक लिमिटेड आणि महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा गिरणा सहकारी बँक आहेत. 

श्री मल्लिकार्जुन पाटणा सहकारी बँक, मस्की आणि नाशिक जिल्हा गिरणा सहकारी बँकेवर लादलेले हे निर्बंध सहा महिने लागू राहतील, असे मध्यवर्ती बँकेने दोन स्वतंत्र निवेदनात म्हटले आहे. नाशिक जिल्हा गिरणा सहकारी बँकेचे 99.87 टक्के ठेवीदार ठेव विमा आणि पत हमी महामंडळ (डीआयसीजीसी) विमा योजनेच्या कक्षेत आहेत. याशिवाय, श्री मल्लिकार्जुन पाटणा सहकारी बँकेचे 99.53 टक्के ठेवीदार देखील DICGC विमा योजनेंतर्गत संरक्षित असल्याचं रिझर्व्ह बँकेने सांगितलं आहे.

कर्नाटकच्या मल्लिकार्जुन पाटणा सहकारी बँकेची सध्याची रोख स्थिती पाहता सर्व बचत बँक किंवा चालू खाती किंवा ठेवीदाराच्या इतर कोणत्याही खात्यातील एकूण शिल्लक रकमेतून कोणतीही रक्कम काढण्याची परवानगी बँक देता येत नाही. परंतु ठेवींवर कर्जाचे समायोजन करण्यास परवानगी आहे अशीच अट महाराष्ट्र स्थित बँकेवरही लादण्यात आल्याचं आरबीआयने सांगितलं

निर्बंध लक्षात घेता, दोन्ही बँका रिझर्व्ह बँकेच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणतेही नवीन कर्ज देऊ शकत नाहीत. एवढेच नाही तर ते कोणत्याही जुन्या कर्जाचे नूतनीकरणही करू शकणार नाहीत. याशिवाय त्यांना कोणतीही नवीन गुंतवणूक करण्याची परवानगी दिली जाणार नाही. ते असे कोणतेही दायित्व घेऊ शकत नाहीत, ज्यामध्ये कर्ज घेणे आणि नवीन ठेवी स्वीकारणे समाविष्ट आहे. रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, दोन्ही बँका आपली आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत निर्बंधांचे पालन करत बँकेचे कामकाज सुरू ठेवतील.


इतर महत्वाच्या बातम्या: 


ITR Filing : आयटीआर अलर्ट! हा एसएमएस तुम्हाला का सातत्याने येतोय, किती महत्त्वाचा आहे, जाणून घ्या?


Share Market : शेअर बाजारात सलग चौथ्या सत्रात वाढ, Nifty 16,500 वर तर Sensex 629 अंकांनी वधारला