RBI Guidebook : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) ऑनलाइन नोकऱ्यांचा शोध घेणाऱ्या आणि करणाऱ्या तरुणांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. सायबर गुन्हेगार आता नव्या पद्धतीने फसवणूक करत असून तुम्ही सुरक्षित राहण्याची गरज आहे, असा इशारा रिझर्व्ह बँकेने जारी केला आहे. आरबीआयने याबाबत एक पुस्तिकाच प्रसिद्ध केली आहे, ज्यामध्ये डिजिटल पेमेंट आणि ऑनलाइन व्यवहार जितक्या वेगाने वाढतो आहेत, तितक्याच वेगाने सायबर गुन्हेगारांचा प्रवेशही यात वाढतो आहे. तुम्हाला कोणत्याही नोकरीसाठी ऑनलाइन अर्ज करायचा असेल, तर तो काळजीपूर्वक करा आणि पैसे देत असाल तर पुन्हा एकदा तपासा, कारण सायबर गुन्हेगार आता नवीन पद्धती वापरत आहेत.
कशी होते फसवणूक?
फसवणूक करणारे नोकऱ्यांबद्दल खोट्या वेबसाइट तयार करतात आणि तुमच्याकडून अर्ज मागतात. नोंदणी करताना तुम्ही तुमचे बँक खाते, आधार आणि मोबाइल क्रमांकाशी संबंधित तपशील टाकता तेव्हा त्यातच फसवणूक होते. सायबर गुन्हेगार एका प्रसिद्ध कंपनीचे अधिकारी म्हणून बनावट मुलाखती घेतात आणि नोंदणी, ट्रेडिंग प्रोग्राम आणि लॅपटॉप इत्यादींसाठी तुमच्याकडून पैशांची मागणी करतात.
टाळण्यासाठी 'या' खबरदारीचे पालन करा
कोणत्याही कंपनीत नोकरीसाठी अर्ज करताना, त्याची ओळख पडताळून पाहा आणि कंपनीच्या प्रतिनिधीशी किंवा कर्मचाऱ्याशी संपर्क होईपर्यंत त्याची माहिती मिळवा. नोकरी देण्यासाठी कोणतीही योग्य कंपनी तुमच्याकडून पैशांची मागणी करत नाही, त्यामुळे अशा कोणत्याही मागणीबाबत सावधगिरी बाळगा. कोणत्याही अज्ञात नोकरी शोधण्याच्या वेबसाइटवर कधीही पैसे देऊ नका.
जनजागृतीसाठी पुस्तिका
डिजिटल व्यवहाराच्या वेळी होणाऱ्या फसवणुकीपासून लोकांचे संरक्षण करण्यासाठी आरबीआयने एक पुस्तिका जारी केली आहे. सायबर गुन्हेगार तुम्हाला जाळ्यात अडकवण्यासाठी कोणती युक्ती वापरतात. कोणताही आर्थिक व्यवहार करताना कोणत्या मूलभूत गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, हेही आरबीआयने आपल्या पुस्तिकेत तपशीलवार स्पष्ट केले आहे.
- RBI on Cryptocurrency : क्रिप्टोकरन्सीवर RBI गर्व्हनरांचे महत्त्वाचे वक्तव्य, म्हणाले...
- LIC IPO : एलआयसी आयपीओ लाँच करण्यासाठी सरकारकडे फक्त 12 मे पर्यंत वेळ; अन्यथा मोठं नुकसान
- ..म्हणून शेअर बाजारात सातत्याने पडझड? विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून 35 हजार कोटी काढले
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha