LIC IPO : सरकारने देशातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC) या कंपनीचा आयपीओ बाजारात आणण्यासाठी गेल्या अर्थसंकल्पात घोषणा केली होती. त्यानंतर सरकारने सेबीकडे कागपत्रंही दाखल केली होती. सेबीची मंजुरीही मिळाली होती. पण त्यानंतरही सरकारकडून या आयपीओसाठी बाजार नियामक सेबीकडे (SEBI) अद्ययावत (updated) मसुदा पेपर दाखल केला आहे. या कागदपत्रांमध्ये डिसेंबर तिमाही निकालांशी संबंधित माहितीचा समावेश आहे. "एलआयसीचा अद्ययावत डीआरएचपी डिसेंबर तिमाहीच्या आर्थिक निकालांसह दाखल करण्यात आला आहे." अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. सरकारने 13 फेब्रुवारी रोजी सेबीकडे आयपीओसाठी रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) मसुदा दाखल केला होता, ज्याला या महिन्याच्या सुरुवातीला सेबीची मंजुरी मिळाली होती.


अद्ययावत मसुदा पेपर दाखल करण्याचे कारण?

वास्तविक, यापूर्वी सेबीमध्ये दाखल केलेल्या ड्राफ्ट पेपरच्या आधारे, एलआयसीचा आयपीओ आणण्यासाठी 12 मे पर्यंत वेळ आहे. त्यानंतर आयपीओ आणण्यासाठी सरकारला सेबीकडे कागदपत्रे नव्याने सादर करावी लागतील. ताज्या अपडेट नुसार, एलआयसीला ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत 235 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला. एप्रिल ते डिसेंबर 2021 दरम्यान निव्वळ नफा वाढून रु. 1,671.57 कोटी झाला.

 

60,000 कोटी रुपये उभारण्याची योजना


सरकारला आयपीओतून सुमारे 316 कोटी शेअर्स किंवा एलआयसीमधील पाच टक्के शेअर्स विकून सुमारे 60,000 कोटी रुपये उभे करायचे आहेत. या आयपीओ मुळे चालू आर्थिक वर्षात 78,000 कोटी रुपयांचे निर्गुंतवणुकीचे लक्ष्य गाठण्यात मदत झाली असती. हा आयपीओ मुळात मार्चमध्ये लॉन्च होणार होता, परंतु रशिया-युक्रेन संकटाच्या दरम्यान शेअर बाजारातील प्रचंड अस्थिरतेमुळे तो पुढे ढकलण्यात आला आहे.
 

इतर महत्त्वाच्या बातम्या: