RBI on Cryptocurrency : केंद्रीय अर्थसंकल्पात आभासी चलनाच्या रक्कमेवर 30 टक्के कर लावण्याची घोषणा झाल्यानंतर देशात आभासी चलनाबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे. रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी आभासी चलनाबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. आभासी चलन हे मॅक्रो इकॉनॉमिक आणि आर्थिक स्थिरतेसाठी धोका असल्याचे शक्तिकांत दास यांनी म्हटले.
रिझर्व्ह बँकेने आज आपले पतधोरण जाहीर केले. त्यावेळी गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी विविध मुद्यावर भूमिका स्पष्ट केली. शक्तिकांत दास म्हणाले की, क्रिप्टोमुळे आर्थिक स्थिरतेशी मुद्द्यांशी सामना करण्याची आरबीआयची क्षमता कमी होईल. केंद्र सरकारने अर्थसंकल्पात आभासी चलनाच्या नफ्यावर कर लावण्याचा निर्णय घेतल्यानंतर एका आठवड्यानंतर दास यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
भारतात आभासी चलनाच्या नफ्यावर कर लावण्यात येणार असला तरी आभासी चलनाला मंजुरी मिळणार नसल्याचे याआधीच अर्थ खात्यातील काही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते.
आरबीआयकडून पतधोरण जाहीर
दरम्यान, रिझर्व्ह बँकेने आपले पतधोरण जाहीर केले असून रेपो दरात कोणताही बदल केला नाही. पतधोरणात रेपो दरामध्ये कोणताही बदल न करता तो 4 टक्के इतका कायम ठेवण्यात आला आहे तर रिव्हर्स रेपो दर 3.35 इतका ठेवण्यात आला आहे.महागाई दर आणि वाढत्या कच्च तेलाच्या किंमती पाहता, देशांतर्गत चलनवाढीच्या स्थितीबाबत मध्यवर्ती बॅंकेच्या आकलनाकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले होते. आरबीआयकडून रिर्व्हस रेपो दरता बदल केले जातील असे म्हटले जात होते. रिझर्व्ह बँकेने येत्या आर्थिक वर्षात विकास दर 7.8 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- GDP Growth Projection: येत्या आर्थिक वर्षात जीडीपी 7.8 टक्के राहण्याचा अंदाज : शक्तिकांत दास
- Income Tax Refund : आयकर विभागाकडून 1.67 लाख कोटींचा कर परतावा; तुमच्या खात्यात आले का पैसे?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha