Budh Shukra Asta 2024 : ग्रहांच्या स्थितीत फार वेगाने बदल घडू लागले आहेत. एकीकडे वृषभ राशीत (Taurus Horoscope) अनेक ग्रहांचा संयोग जुळून आला आहे. तर, दुसरीकडे सूर्याने दोन शुभ ग्रहांची शक्ती घेतली आहे. म्हणजेच सध्या बुध आणि शुक्र हे दोन्ही ग्रह यांचा अस्त झाला आहे. दोन ग्रहांच्या अस्तामुळे अनेक लोकांच्या मनावर अनेक बदल दिसून येतायत. शुक्र हा वृषभ आणि तूळ या दोन ग्रहांचा स्वामी आहे. त्यामुळे चार राशींवर (Zodiac Signs) त्याचा कसा परिणाम होणार आहे ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीत अनेक ग्रहांचा संयोग जुळून आल्याने वृषभ राशीवर याचा परिणाम होणार आहे. यासाठी या राशीच्या लोकांनी अति उत्साहात राहू नये. तसेच, या काळात मद्यपान करू नये. तुमच्या आई-वडिलांचा आदर करा. तुमच्या कामाच्या ठिकाणी महिला वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून कोणताही वाद घालू नका. जर तुम्हाला कर्ज घ्यायचं असेल तर त्यासाठी हा काळ शुभ नाही. या काळात तुमचं आर्थिक नुकसान होण्याची जास्त शक्यता आहे.
मिथुन रास (Gemini Horoscope)
प्रवासासंबंधित आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला राहणार आहे. तुम्हाला नकळतपणे लाभ मिळत जाईल. तसेच, तुमच्या कामासंबंधित महत्त्वाच्या व्यक्तीशी आज तुमची भेट होऊ शकते.जर तुम्हाला एखाद्या वस्तूची खरेदी करायची असेल तर आजचा दिवस चांगला आहे. तसेच, तुमच्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीची तब्येत बिघडल्याने तुम्हाला मानसिक त्रास होऊ शकतो.
कन्या रास (Virgo Horoscope)
तुमच्या जोडीदाराबरोबर एखाद्या गोष्टीवरून तुमचा वाद होऊ शकतो. त्यामुळे हा वाद मिटविण्याचा प्रयत्न करा. तसेच, जर तुम्ही धार्मिक स्थळाला भेट देण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी हा काळ फार चांगला आहे. तसेच, जर तुमचे अनेक दिवसांपासून सरकारी काम रखडले असेल तर ते लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे. या राशीवर सूर्याची छाया पडल्याने तुमच्यावर चांगला परिणाम दिसून येणार आहे. तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे तुम्ही पूर्ण करू शकता. तसेच, या काळात तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत सतर्क राहा. तुमचा आत्मविश्वास मध्येच ढासळू शकतो. तर, मध्येच तुमचा क्रोध वाढू शकतो. तसेच, तुमच्या नशीबावर अवलंबून राहू नका. त्यामुळे तुम्ही इतरांच्या तुलनेत फार मागे राहू शकता.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: