Stone pelting on ST bus : एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेत कामावर रुजू होण्याचे आवाहन एसटी महामंडळाने केले होते. महामंडळाच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यातील काही आगारांमधील एसटी वाहतूक सुरू झाली आहे. तर, दुसरीकडे संपकऱ्या कर्मचाऱ्यांचा विरोध कायम आहे. अहमदनगर जिल्ह्यात शेवगाव आगाराच्या तीन एसटी बसेसवर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत एसटी बस चालक जखमी झाला आहे. या दगडफेकीच्या घटनेमुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 


शेवगाव आगारातील एसटी कर्मचारी आणि आगारप्रमुख यांच्या चर्चा झाली. या चर्चेनंतर सर्व कर्मचारी कामावर रुजू झाले. अहमदनगर जिल्ह्यातील फक्त एकाच आगारातील संप मागे घेण्यात आला आहे. आज सकाळपासून शेवगाव आगारातील वाहतूक सुरू झाली. शेवगाव आगारातून पैठण, नगर शहर, श्रीरामपूरकडे जाणाऱ्या तीन एसटी बसवर अज्ञातांनी दगडफेक केली. शेवगाव-नगर बसवर अमरापूरजवळ बसच्या मागील बाजूस दगडफेक केली. यामध्ये बसची काच फुटली. चक. शेवगाव-श्रीरामपूर बसवर सौंदळा येथे दगडफेक झाली. शेवगाव-पैठण बसवर दहिफळ फाटा येथे दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत एसटी चालक नामदेख खंडागळे जखमी झाले आहेत. या दगडफेकीची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. 


दगडफेक करणारे अज्ञात कोण?


एसटी कर्मचाऱ्यांनी एकमताने संप मागे घेतला असल्याचे म्हटले जाते. त्यानंतरही एसटीवर दगडफेक अज्ञात कोण याबाबत चर्चा सुरू झाल्यात आहेत. एसटी बस पुन्हा सुरू झाल्याने खासगी वाहतुकदारांना याचा फटका बसणार होता. त्यामुळे त्यांच्याकडून हे कृत्य झाले असल्याची चर्चा आहे. 


राज्यात एसटी पुन्हा धावली


दरम्यान, राज्यातील काही आगारांमध्ये पुन्हा एकदा एसटी धावण्यास सुरुवात झाली आहे. सांगली जिल्ह्यातील सर्व आगारातून एसटी सेवा सुरू झाली आहे. रायगड जिल्ह्यातील महाड, पेण, रोहा माणगाव या आगारामध्ये वाहतूक सुरू झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, दापोली, राजापूर, लांजा, देवरूख या आगारातील वाहतूक सुरू झाली आहे. कोल्हापूर आगारातूनही काही मार्गांवरील वाहतूक सुरू करण्यात आली. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:


Omicron covid new variant : नव्या व्हेरिएंटचा धोका किती, उपाय काय? A टू Z माहिती


ST Strike : पैसे देऊनही संप सुरु राहत असेल तर पगारवाढीच्या निर्णयाचा फेरविचार करणार; अनिल परबांचा इशारा


 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA