RBI Action : नियमांचा भंग आणि गैरप्रकार केल्याप्रकरणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) 2 बँकांवर कारवाई केली आहे. RBI ने केलेल्या तपासणीत दोन वित्तीय संस्थांकडून व्यवसाय वाढवण्यासाठी करण्यात येत असलेले गैरप्रकार उघड झाले आहेत. मन्नापुरम फायनान्स आणि इंडसइंड बँक या दोन 2 वित्तीय संस्थांवर कारवाई करण्यात आली आहे. या दोन्ही वित्तीय संस्थांना लाखो रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
फायनान्स कंपन्या आणि काही खासगी बँकांनी नियम मोडून काम करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यांच्याबद्दलच्या तक्रारी रोज येत असतात. रिझर्व्ह बँकेच्या तपासणीत दोन वित्तीय संस्थांकडून व्यवसाय वाढवण्यासाठी अशाच प्रकारच्या उपाययोजना केल्या जात असल्याचे समोर आले आहे. या दोघांवर मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. मन्नापुरम फायनान्स आणि इंडसइंड बँक या दोन वित्तीय संस्था आहेत. या दोघांची 31 मार्च 2023 पर्यंतची आर्थिक परिस्थिती तपासण्यासाठी रिझर्व्ह बँकेने केलेल्या तपासणीत त्यांचे गैरप्रकार उघड झाले आहेत. रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी मन्नापुरम फायनान्सवर 27 लाख 30 हजार रुपयांचा दडं ठोठावला आहे. तर इंडसइंड बँकेला 20 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
एकाच ग्राहकाला अनेक ग्राहक आयडी
मन्नापुरम फायनान्स जॉईन करताना ग्राहकाच्या पॅनकार्डची पडताळणी न केल्याबद्दल दोषी आढळले आहे. रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांना तपासादरम्यान अशी अनेक उदाहरणे सापडली. याशिवाय मन्नापुरम फायनान्सलाही युनिक कस्टमर आयडी देण्याऐवजी एकाच ग्राहकाला अनेक ग्राहक आयडी दिल्याबद्दल दोषी आढळले आहे. तसेच इंडसइंड बँकेतही धक्कादायक प्रकरणे समोर आली आहेत. येथे अनेक बचत खाती अशा लोकांच्या नावाने उघडण्यात आली आहेत, जे त्यासाठी पात्र नव्हते. या आरोपावरुन आर्थिक दंड ठोठावण्यात आला आहे. दोन्ही कंपन्यांविरुद्ध कारवाईचे कारण म्हणजे रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे उल्लंघन हे आहे.
रिझर्व्ह बँकेने यापूर्वी कारणे दाखवा नोटीस दिली होती
रिझर्व्ह बँकेने याआधी दोन्ही वित्तीय संस्थांना कारणे दाखवा नोटीस बजावली गहोती. तसेच त्यांच्याविरुद्ध दंड का लावू नये? अशी विचारणा देखील केली होती. दोन्ही कंपन्यांकडून मिळालेल्या उत्तरांचा विचार करून रिझर्व्ह बँकेने हा दंड ठोठावला आहे. दरम्यान, अनेक बँका नियमांचा भंग करतात, अशा वेली बँका नोटीस देखील पाठवत असते. मात्र, वारंवार नियमांचा भंग केल्यास RB अशा वित्तीय संस्थांवर कारवाईचा बडगा उगारते.
महत्वाच्या बातम्या:
Fact Check: दोन बँक खाती असल्यास दंड भरावा लागणार? आरबीआयच्या नावानं अनेक दावे,नेमकं सत्य काय?