Rupee Bank : तुमचं खातं या सहकारी बँकेत असले तर दोन दिवसांनी तुम्हाला तुमच्या खात्यातील रक्कम काढता येणार नाही. रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank Of India) याची कल्पना आधीच दिली आहे. पुण्यातील रुपी सहकारी बँक लिमिटेडचा (Rupee Co-operative Bank Limited) परवाना रद्द केला आहे. त्यामुळे बँकेतील ग्राहकांना 21 सप्टेंबरपर्यंत खात्यातील रक्कम काढता येणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार 22 सप्टेंबरपासून बँकेची सर्व सेवा बंद होणार आहे. त्यामुळे ग्राहकांना खात्यातून पैसे काढता येणार नाही. रिझर्व्ह बँकेने रुपी सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे आधीच जाहीर केले होते. 


बँकेचा बँकिंग व्यवसाय परवाना रद्द 


येत्या 22 सप्टेंबर 2022 पासून रुपी बँकेला बँकिंग व्यवसाय बंद करण्याचे आदेश आरबीआयने दिलेत. बँकिंग व्यवसाय चालू ठेवण्याची परवानगी दिल्यास सार्वजनिक हितावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे असे आरबीआयने म्हटले. सहकार आयुक्त आणि सहकारी संस्थांचे निबंधक, महाराष्ट्र यांना देखील बँक बंद करण्याचा आदेश जारी करण्याची आणि बँकेसाठी लिक्विडेटर नियुक्त करण्याची विनंती करण्यात आली आहे. 


ठेवीवर मिळणार विमा


डिपॉझिट इन्शुरन्स आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) कडून पाच लाख रुपयापर्यंतच्या आर्थिक मर्यादेपर्यंत प्रत्येक ठेवीदाराला त्याच्या ठेवींची ठेव विमा दाव्याची रक्कम प्राप्त करण्याचा अधिकार असणार आहे. बँकेने सादर केलेल्या आकडेवारीनुसार, 99 टक्क्यांपेक्षा जास्त ठेवीदारांना त्यांच्या ठेवींची संपूर्ण रक्कम DICGC कडून मिळण्याचा अधिकार आहे. 18 मे 2022 पर्यंत, DICGC ने बँकेच्या संबंधित ठेवीदारांचे तरतुदींनुसार एकूण विमा उतरवलेल्या ठेवींपैकी 700 कोटी आधीच भरले आहेत. 


रुपी बँकेवर कारवाई का?


रुपी बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईची शक्यता नसल्याचे रिझर्व्ह बँकेने आपल्या अहवालात म्हटले. बॅंकिंग नियमांचे पालन करण्यात बॅंक अपयशी ठरली असून बॅंक आपल्या ठेवीदारांसाठी व्यवहार सुरु ठेवण्यास प्रतिकूल नाही असंही आरबीआयने म्हटले आहे. सध्याची परिस्थिती पाहता बँक आपल्या ठेवीदारांना पैसे परत देऊ शकणार नाही असे आरबीआयने आपल्या निर्णयात स्पष्टपणे नमूद केले आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: