Direct Tax Collection : देशातील प्रत्यक्ष कर संकलनात (Direct Tax Collection) मोठी वाढ झाली आहे.  प्रत्यक्ष कर संकलनात 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यासह सरकारी तिजोरीत 8.36 लाख कोटी रुपये जमा झाले आहेत. 2022-23 या आर्थिक वर्षात 17 सप्टेंबरपर्यंत झालेल्या एकूण प्रत्यक्ष कर संकलन 8.36 लाख कोटी रुपये जमा झाले आहेत. हे कर संकलन गेल्या वर्षीच्या तुलनेत 30 टक्क्यांनी जास्त आहे. अर्थ मंत्रालयाने रविवारी यासंदर्भात माहिती दिली आहे. 2022-23 या आर्थिक वर्षातील आतापर्यंत झालेलं एकूण कर संकलन (टॅक्स रिफंडच्या आधी) 8,36,225 कोटी रुपये आहे, जे मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत झालेल्या संकलनापेक्षा 30 टक्के जास्त आहे. गेल्या वर्षी  6,42,287 कोटी रुपये संकलन झालं होतं.


अर्थ मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे की 8.36 लाख कोटी रुपयांच्या एकूण संकलनापैकी 4.36 लाख कोटी रुपये कॉर्पोरेट आयकरातून आणि 3.98 लाख कोटी रुपये वैयक्तिक आयकर (पीआयटी) मधून आले आहेत. PIT मध्ये सुरक्षा व्यवहार कर समाविष्ट आहे.