RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने फिनटेक स्टार्टअप्सना नवी दिशा दिली आहे. खरेतर, आरबीआयने प्रीपेड पेमेंट साधनांना म्हणजेच नॉन-बँकिंग क्षेत्रातील PPI जारीकर्त्यांना क्रेडिट सुविधेद्वारे त्यांच्या वॉलेट (Wallet) आणि कार्डमध्ये (Card) पैसे न टाकण्यास सांगितले आहे.
वॉलेट आणि प्रीपेड कार्ड ही PPI ची उदाहरणे आहेत. सेंट्रल बँकेने प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्सवर 'मास्टर' डायरेक्शन्स (PPI-MD) जारी केले आहेत. ज्यामुळे पीपाआय (PPI) ला रोख, बँक खाती, (Bank Account) क्रेडिट आणि डेबिट कार्ड (Debit Card), PPI आणि इतर पेमेंट साधनांद्वारे 'लोड' आणि 'रीलोड' करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ही रक्कम फक्त भारतीय चलनात असावी.
सूत्रांनी सांगितले की, आरबीआयने सर्व अधिकृत नॉन-बँक पीपीआय जारीकर्त्यांना या निर्बंधाबद्दल माहिती दिली आहे. सूत्रांनुसार, आरबीआयने PPI जारीकर्त्यांना सांगितले आहे की मास्टर डायरेक्शन्स PPI ला क्रेडिट सुविधेतून 'लोड' करण्याची परवानगी देत नाहीत. असेच प्रकार सुरू राहिल्यास ते तातडीने थांबवावे, असे त्यांनी म्हटले आहे.
क्रेडिट सुविधेद्वारे पैसे हस्तांतरित करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. एकाहून अधिक प्रीपेड वॉलेट्स आणि कार्ड्ससाठी एक क्रेडिट सुविधा वापरली जात होती. या हालचालीमुळे काही फिनटेक कंपन्यांच्या व्यवसाय मॉडेलवर परिणाम होईल असं पेमेंट्स ट्रान्सफॉर्मेशन लीडर', PwC इंडियाच्या मिहिर गांधी यांनी सांगितलं. सेंट्रल बँकेने पेपर व्हाउचरच्या स्वरूपात PPI जारी करण्यावर बंदी घातली आहे. PPI कार्ड, वॉलेट आणि इतर कोणत्याही व्यवहाराच्या स्वरूपात जारी केले जातात.
महत्वाच्या बातम्या