Reserve Bank Of India : केंद्र सरकारने आनंद महिंद्रा (Anand Mahindra), पंकज आर पटेल (Pankaj Patel) आणि वेणू श्रीनिवासन यांसारख्या उद्योगपतींची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या केंद्रीय बोर्डात म्हणजेच आरबीआयच्या संचालक मंडळावर समावेश केला आहे. याशिवाय इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM-अहमदाबाद) चे माजी प्राध्यापक रवींद्र एच ढोलकिया यांनाही बोर्डात सामील करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने या नियुक्त्यांवर शिक्कामोर्तब केले आहे. त्यांची नियुक्ती 14 जूनपासून लागू झाली आहे.


4 वर्षांसाठी नियुक्त्या


RBI ने मंगळवारी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, केंद्र सरकारने आनंद महिंद्रा, रवींद्र ढोलकिया, वेणू श्रीनिवासन आणि पंकज पटेल यांचा RBI च्या बोर्डात समावेश केला आहे. चार वर्षांसाठी या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने या नियुक्त्यांवर शिक्कामोर्तब केले आहे. त्यांची नियुक्ती 14 जून लागू झाली आहे. दरम्यान, वित्तीय आणि बँकिंग क्षेत्राचे नियामक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे कामकाज, भारतीय रिझर्व्ह बँक कायद्यांतर्गत केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या केंद्रीय संचालक मंडळाद्वारे नियंत्रित केले जाते.  


RBI बोर्डात इतर क्षेत्रातील प्रतिनिधींचा समावेश


आनंद महिंद्रा हे जायंट महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आहेत. ऑटोमोबाईल कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा ही या समूहाची कंपनी आहे. वेणू श्रीनिवासन हे TVS मोटर आणि सुंदरम क्लेटनचे अध्यक्ष एमेरिटस आहेत. पंकज पटेल हे Zydus Lifesciences चे अध्यक्ष आहेत. रवींद्र ढोलकिया आयआयएम अहमदाबाद येथे प्राध्यापक आहेत आणि ते निवृत्त झाले आहेत. आरबीआयच्या बोर्डात आर्थिक जग, औद्योगिक आणि इतर क्षेत्रातील प्रतिनिधींचा समावेश आहे. 


महत्वाच्या इतर बातम्या


Schools Starts : राज्यात आजपासून प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या शाळा सुरु, शाळेची पहिली घंटा वाजणार


Todays Headline 15th June : आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या