Reliance Share : 37 वर्षांपूर्वीचे रिलायन्सचे शेअर सापडले, 300 रुपयांच्या 30 शेअरचे बनले 11 लाख, आता तरुणानं घेतला मोठा निर्णय

Reliance Share : चंदीगडमधील एका तरुणाला घराची साफ सफाई करताना रिलायन्स इंडस्ट्रीजचे 37 वर्षांपूर्वीचे शेअर सापडले. त्याची किंमत आता 11 लाखांपर्यंत पोहोचलीय.

Continues below advertisement

नवी दिल्ली : चंदीगडमधील तरुण रतन धिल्लाँ याला घराची स्वच्छता करताना दोन कागदपत्रं सापडली. ती कागदपत्र रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरची होती. त्यानं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म पोस्ट करत यासंदर्भातील माहिती विचारली. यावर जाणकारांनी त्याबद्दल माहिती दिली. संबंधित तरुणानं एक्सवर दोन फोटो पोस्ट केले. जे रिलायन्सच्या शेअरचे होते. 1987 आणि 1992 मध्ये हे शेअर खरेदी करण्यात आले होते. त्यावेळी 300 रुपयांना खरेदी केलेल्या 30 शेअर्सचा सध्याची रक्कम 11 लाख रुपयांपर्यंत पोहोचली असल्याची माहिती जाणकारांनी त्याला दिली. मात्र, त्यानं मोठा निर्णय घेतला आहे. 

Continues below advertisement

रतन धिल्लाँ यानं एक्स पोस्ट करुन विचारलं की आम्ही या शेअरचे मालक आहोत का? त्यानं यामध्ये रिलायन्स ग्रुपच्या एक्स अकाऊंटला देखील टॅग केलं. त्यावर एका यूजरनं त्या शेअरची किंमत किती होत आहे याची आकडेवारी सादर केली. रिलयान्सचा शेअर तीन वेळा स्प्लिट झाला, त्यानंतर दोन बोनस धरुन त्याचे 960 शेअर होतात. आणि सध्याचं त्याचं मूल्य 11 लाखांपर्यंत होत असल्याचं म्हटलं. 

 यावर सरकारच्या इन्वेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड अथॉरिटीनं त्याला रिप्लाय दिला. ते शेअर अनक्लेम्ड राहिले असल्यास ते आयईपीएफला ट्रान्सफर करण्याची सूचना केली. झीरोधानं ते त्याला मदत करु असं म्हटलं. 

300 रुपयांचे 11 लाख रुपये होतात असं समोर आल्यानंतर याची सर्वत्र चर्चा झाली. रतन धिल्लाँ याला लॉटरी लागली, असं म्हटलं गेलं. 

तरुणाचा मोठा निर्णय

तरुणाला सापडलेल्या या रिलायन्सच्या  30 शेअरची सर्वत्र चर्चा झाली. मात्र, त्यानं दुसरी पोस्ट करत म्हटलं की त्या शेअरला तो डिजीटल करणार नाही. तो म्हणाला की  धीरुभाई अंबानी यांच्या सह्या वाया जाणार असं दिसतं कारण या शेअर्सला डिजीटल न करण्याचा निर्णय घेतोय. 

या शेअर्सला डिजीटल करण्याची प्रक्रिया खूप मोठी आहे. यासाठी कायदेशीर मदत घ्यावी लागेल. आयईपीएफएकडील प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 2-3 वर्ष लागतात. त्यामुळं या मध्ये फार वेळ घालवण्याची गरज नाही. भारतानं पेपरवर्कची प्रक्रिया सोपी केली पाहिजे, असं तो म्हणाले. शेवटी भागप्रमाणपत्र तशीचं ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं तो म्हणाला. 

इतर बातम्या :

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola