SIP : एसआयपीद्वारे गुंतवणुकीचा नवा विक्रम, मे महिन्यात 26688 कोटी रुपयांची गुंतवणूक, नेमकं कारण काय?
SIP : एसआयपीद्वारे गुंतवणुकीच्या नव्या उच्चांकाची नोंद मे महिन्यात झाली आहे. तब्बल 26688 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.
Continues below advertisement
एसआयपीतून विक्रमी गुंतवणूक
Continues below advertisement
1/5
एसआयपीद्वारे गुंतवणुकीच्या नव्या विक्रमाची नोंद करण्यात आली आहे. मे महिन्यात एसआयपीद्वारे 26,688.22 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली. ही माहिती असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंडस इन इंडियाद्वारे जारी करण्यात आली आहे.
2/5
एसआयपी गुंतवणुकीद्वारे वाढलेली आर्थिक गुंतवणूक हे गुंतवणूकदारांच्या शिस्त, दीर्घकालीन गुंतवणूक याचं निदर्शक असल्याच सीईओ वेंकट नागेश्वर चालसानी यांनी केलं.
3/5
ओपन एंडेड स्कीम्समधील गुंतवणूक मात्र एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात 2.78लाख कोटींनी घटलं. एप्रिल महिन्यात एसआयपीतून बाहेर गेलेली रक्कम 15908.48 कोटी रुपये इतके आहेत. ही रक्कम डेब्ट फंडमधून काढली गेली आहे.
4/5
डेब्ट फंड मध्ये गुंतवणूक वाढली असून ती 11983.35 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. तर, 11223.08 कोटी रुपयांची गुंतवणूक मनी मार्केट फंडसमध्ये झाली आहे.
5/5
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Continues below advertisement
Published at : 11 Jun 2025 11:59 PM (IST)