Ratan Tata Cryptocurrency: क्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणुकीकडे अनेकजण आकृष्ट होत आहेत. क्रिप्टोमधील गुंतवणुकीच्या सकारात्मक बाबी दाखवण्यासाठी काहीजण प्रयत्नशीलही दिसता. अनेक दिग्गज सेलिब्रेटी, उद्योगपतींची गुंतवणूक क्रिप्टोमध्ये असल्याचे वृत्त अनेकदा समोर येते. टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा (Ratan Tata) यांचीदेखील क्रिप्टोकरन्सीमध्ये (cryptocurrency) गुंतवणूक असल्याची चर्चा होती. मात्र, या वृत्ताचा रतन टाटा यांनी इन्कार केला आहे. टाटा यांनी क्रिप्टोकरन्सीशी आपला काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे.



रतन टाटा यांनी याबाबत एक ट्विट केले आहे. त्यांनी म्हटले की, मी नेटिझन्सना विनंती करू इच्छितो की, माझा क्रिप्टोकरन्सीशी काहीही संबंध नाही हे समजून घ्यावे. माझ्या क्रिप्टोकरन्सीशी संबंधित कोणताही लेख (लेख) किंवा जाहिरात (जाहिरात) तुम्हाला दिसली तर ती पूर्णपणे खोटी असून नागरिकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला आहे, असेही टाटा यांनी म्हटले. 






यापूर्वी, महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा देखील क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणुकीच्या खोट्या बातम्यांचे बळी ठरले आहेत. क्रिप्टोकरन्सीमध्ये केलेल्या गुंतवणुकीमुळे बँकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून तज्ञ आश्चर्य व्यक्त करत आहेत, असे व्हायरल झालेल्या फेक न्यूजमध्ये म्हटले होते. त्याशिवाय, आनंद महिंद्रा यांना कमाईसाठीचा एक मार्ग सापडला असून गुंतवणूकदारांना तीन ते चार महिन्यात करोडपती बनवणार असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, आनंद महिंद्रा यांनी हे वृत्त फेटाळून लावले होते. आपण क्रिप्टोकरन्सीमध्ये एक रुपयाही गुंतवला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 


क्रिप्टोकरन्सीबाबत जगातील अनेक तज्ञांमध्ये मतभिन्नता आहे. वॉरेन बफे यांनी बिटकॉइनला जुगाराचे टोकन म्हणत क्रिप्टोकरन्सी नाकारली आहे.


सरकारने अद्याप भारतात क्रिप्टोकरन्सीला मान्यता दिलेली नाही. पण गेल्या वर्षी क्रिप्टोकरन्सी नफ्यात विकण्यावर ३० टक्के कर लावण्यात आला होता, त्यानंतर प्रत्येक व्यवहारावर एक टक्का टीडीएसची तरतूदही लागू करण्यात आली आहे.



(Disclaimer: क्रिप्टो उत्पादने आणि नॉन-फंजीबल टोकन (NFT)अनियंत्रित आणि अत्यंत धोकादायक असू शकतात. अशा व्यवहारांमुळे होणार्‍या कोणत्याही हानीसाठी कोणतेही नियामक उपाय असू शकत नाहीत. क्रिप्टोकरन्सीला कायदेशीर मान्यता नाही. हे बाजारातील जोखमींच्या अधीन आहे. वाचकांना सल्ला दिला जातो की, यासाठी त्यांनी तज्ञांचा सल्ला घ्यावा आणि कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या विषयावरील महत्त्वाची कागदपत्रे, ऑफर दस्तऐवज काळजीपूर्वक वाचन करावे. )


इतर महत्त्वाच्या बातम्या: