मुंबई: देशातील उद्योगविश्वाचे शिल्पकार आणि टाटा ग्रुपचे प्रमुख रतन टाटा (Ratan Tata) यांचं बुधवारी (9 ऑक्टोबर 2024) रात्री निधन झालं. रतन टाटा यांचं वय  86 वर्ष होतं. रतन टाटा यांनी उद्योगविश्वासह देशभरात सामाजिक उपक्रमांना हातभार लावला. टाटा ट्रस्टच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रातील कामासाठी रतन टाटांनी मदत केली.  रतन टाटा यांनी लग्न केलं नव्हतं रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या टाटा सन्सचा वारसरदार कोण असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यासंदर्भातील चर्चा सुरु आहेत.


रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या उद्योगांची जबाबदारी कोणाकडे येणार हे जाणून घेण्यासाठी टाटांच्या कुटुंबाविषयी माहिती जाणून घेणं महत्त्वाचं आहे. रतन टाटा यांच्या वडिलांचं नाव नवल टाटा तर आईचं नाव सोनी टाटा होतं. 1940 च्या दशकात नवल टाटा आणि सोनी टाटा यांच्यात घटस्फोट झाला. त्यानंतर नवल टाटा यांनी सिमोन यांच्याशी लग्न केलं. या दोघांच्या मुलाचं नाव नोएल टाटा आहे. रतन टाटा यांचे ते सावत्र भाऊ आहेत. त्यामुळं रतन टाटा यांचं साम्राज्य नोएल टाटा यांच्या नातेवाईकांकडे जाण्याची शक्यता आहे. नोएल टाटा यांना तीन मुलं असून त्यांची नावं माया, नेविल  लिआ टाटा अशी आहेत.  


माया टाटा


नोएल टाटा यांची मुलगी माया टाटा यांच्याकडे रतन टाटांची संपत्ती जाण्याची शक्यता आहे. माया टाटा यांचं वय 34 वर्ष असून बेयस बिझनेस स्कूल आणि वारविक विद्यापीठातून त्यांनी पदवी मिळवली आहे. टाटा अपॉर्च्यूनिटी फंड पासून करिअर सुरु केलं, त्यानंतर त्या टाटा डिजिटलमध्ये गेल्या. तिथं त्यांनी Tata Neu हे अॅप विकसित आणि लाँच करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सध्या त्या टाटा मेडिकल ट्र्स्टच्या बोर्डामध्ये त्यांच्या भाऊ आणि बहिणींसह काम करतात. माया टाटा यांची आई टाटा ग्रुपचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांची बहीण आणि दिवंगत उद्योगपती पालोनजी मिस्त्री यांची मुलगी आहे.  


नेविल टाटा


माया टाटाचा भाऊ नेविल टाटा (32 वर्ष) कोंटुबिक उद्योग पाहतात. रतन टाटा यांच्या साम्राज्याचे वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. नेविल टाटा यांचं लग्न टोयोटा किर्लोस्कर ग्रुपच्या उत्तराधिकारी मानसी किर्लोस्कर यांच्यासोबत झालं आहे.या दोघांना एक मुलगा असून त्याचं नाव जमशेद टाटा आहे. नेविल टाटा स्टार बाजारचं नेतृत्त्व करतात. ट्रेंट लिमिटेडच्या अंतर्गत हायपरमार्केटमध्ये कार्यरत आहेत नेविल यांना पहिल्यांदा पॅकिंग अन्न पदार्थ आणि बेवरेज विभागाचं व्यवस्थापन सोपवण्यात आलं होतं. यामध्ये त्यांनी यश मिळवल्यानंतर झडियो आणि वेस्टसाईडचं कामकाद देखील सोपवण्यात आलं आहे. काही तज्ज्ञांच्या मते नेविल टाटा यांना टाटा ग्रुपचे उत्तराधिकारी म्हणून तयार केलं जात होतं.


लिआ टाटा


नेविल आणि माया टाटा यांची बहीण लिआ टाटा (39 वर्ष) हॉटेल व्यवसाय पाहतात. स्पेनच्या आईई बिझनेस स्कूलमध्ये शिक्षण घेतलं होतं. त्यांनी  ताज हॉटेल्स रिसॉर्ट्स अँड पॅलेसेस मध्ये काम केलं आहे. त्या सध्या  इंडियन हॉटेल कंपनीचं व्यवस्थापन पाहतात. 2010 मध्ये त्यांनी लुई वुइटनमध्ये काही काळ इंटर्नशिप केली होती. लिआ टाटा यांचं लक्ष पूर्णपणे हॉटेल क्षेत्रात होतं. 



इतर बातम्या : 



Ratan Tata Death: निष्कलंक चारित्र्य अन् लाखोंच्या हदयात आदराचे स्थान मिळवणाऱ्या रतन टाटांची भौतिक संपत्ती किती?