Ratan Tata : रतन टाटा (Ratan Tata) हे व्यवसाय जगतातील एक मोठं व्यक्तिमत्व आहे. रतन टाटा हे केवळ टाटा समूहाला त्यांच्या नेतृत्वाखाली शिखरावर नेण्यासाठी ओळखले जात नाहीत, तर त्यांनी त्यांच्या आयुष्यात घेतलेल्या निर्णयांमुळे ते लोकांसाठी आदर्श बनले आहेत. आज आम्ही तुम्हाला रतन टाटा यांच्या सर्वात विश्वासू व्यक्तिविषयी माहिती सांगणार आहोत. ज्याच्याबद्दल आजच्यापूर्वी तुम्हाला क्वचितच माहीत असेल. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, रतन टाटा यांनी 11 लाख कोटी रुपयांच्या व्यवसायाची जबाबदारी त्या व्यक्तीला दिली आहे. ती व्यक्ती रतन टाटा यांचा उजवा हात असल्याचे सांगितले जात आहे. 


एन चंद्रशेखरन (N chandrasekaran) असे रतन टाटा यांच्या विश्वासू व्यक्तीचे नाव आहे. ते नटराजन म्हणून ओळखले जातात, त्यांनी टाटा सन्सच्या अध्यक्षाची भूमिका बजावली होती. यापूर्वी, त्यांनी 2009 ते 2017 पर्यंत टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) चे CEO आणि MD म्हणूनही काम केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली, TCS ने 2015-2016 या आर्थिक वर्षात 16.5 अब्ज डॉलर (सुमारे 1.36 लाख कोटी) च्या एकूण महसुलासह प्रचंड वाढ झाली आहे. ज्यामुळं ती भारतातील सर्वात मौल्यवान खासगी कंपनी म्हणून ओळखली गेली.


नटराजन यांची कारकीर्द कशी?


नटराजन यांनी तमिळनाडूच्या कोईम्बतूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून अप्लाइड सायन्सेसमध्ये पदवी आणि तिरुचिरापल्ली येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स (MCA) मध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. 1987 मध्ये TCS मधील त्यांची उल्लेखनीय कारकीर्द सुरू झाली, जिथे त्यांनी इंटर्न म्हणून सुरुवात केली आणि काही वेळातच त्यांनी कंपनीचे सर्वोच्च स्थान प्राप्त केले. टाटा सन्सच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यापासून, एन चंद्रशेखरन डिजिटल इनोव्हेशन, स्थिरता आणि पुरवठा साखळी सुलभ करण्यात भूमिका बजावताना दिसत आहेत. मोबाईल तंत्रज्ञान, ग्राहक इंटरनेट प्लॅटफॉर्म आणि 5G मधील प्रचंड वाढीसाठी भारतातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात मोठी जबाबदारी त्यांच्याकडे होती. त्यांच्या नेतृत्वाखाली आज टाटा सन्स कार्यरत आहे. टाटा समूह चालवणारी संस्था टाटा सन्स आहे. ज्याचा प्रभार सध्या एन चंद्रशेखरन यांच्याकडे आहे. सध्या सन्सचे मूल्यांकन 11 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली समूहाने नुकतेच एअर इंडियाचे अधिग्रहण केले आहे.


सर्वाधिक पगारी असणारे व्यक्ती


एन चंद्रशेखरन यांचे सॅलरी पॅकेज भारतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या लोकांच्या यादीत आहे. त्यांनी 2019 साठी 65 कोटी रुपयांचे वार्षिक पॅकेज घेतले होते. ते भारतातील सर्वात जास्त पगार घेणारे बिझनेस एक्झिक्युटिव्ह आहेत.


महत्वाच्या बातम्या:


देशातील सर्वात यशस्वी कंपन्या कोणत्या? तीन वर्षांपासून 'ही' कंपनी सर्वात मौल्यवान