Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराच्या निर्मितीमध्ये टाटा समूहाचा मोठा वाटा आहे. मंदिराच्या निर्मितीनंतर आता टाटाच्या इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडने (Tata Group IHCL) मोठी घोषणा केली आहे. टाटा समूहाकडून आता अयोध्या शहराचा चेहरामोहरा बदलवण्याचा प्रयत्न असून अयोध्येत एक मोठं हॉटेल सुरू करण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये टाटा समूहाचे दोन मोठे हॉटेल असून अयोध्येतील हे तिसरे हॉटेल असणार आहे. 


अयोध्येत असलेल्या राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याला देशातील नामवंत उद्योगपतीही उपस्थित होते. यावेळी टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा (Ratan Tata) देखील उपस्थित होते. त्यावेळी टाटा समूहाच्या मालकीच्या इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडने एक मोठी घोषणा केली आहे. कंपनीने आता उत्तर प्रदेशातील अयोध्या शहरात तिसरे हॉटेल उघडण्याचे कंत्राट जाहीर केले आहे. कोणत्या प्रकारच्या इंडियन हॉटेलची घोषणा केली आहे हे देखील सांगूया.


हॉटेलमध्ये 150 खोल्या असतील


टाटा समूहाच्या इंडियन हॉटेल्सने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, अयोध्येत निर्मित होणारे हे हॉटेल 1.3 एकरमध्ये पसरलेले असेल. ज्यामध्ये 150 खोल्या असतील. हे हॉटेल इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड (IHCL) ब्रँडच्या नियंत्रणाखाली निर्मित केलं जाईल. आयएचसीएलचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ पुनित चटवाल ​​म्हणाले की, रामजन्मभूमी मंदिराच्या उद्घाटनानंतर अयोध्या हे जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र म्हणून उदयास येत आहे. हे शहर जगभरातील पर्यटकांचा ओघ आकर्षित करण्यासाठी सज्ज आहे,


शेअर्समध्ये वाढ होऊ शकते


टाटा समूहाच्या या निर्णयानंतर मंगळवारी कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ दिसू शकते. याआधी शनिवारी कंपनीच्या शेअर्समध्येही सुरुवातीची वाढ दिसून आली. ट्रेडिंग सत्रादरम्यान कंपनीच्या शेअर्सने 52 आठवड्यांच्या विक्रमी उच्चांकी 486.55 रुपये गाठले होते. त्याच्या बाजारात घसरण झाली आणि कंपनीचे शेअर्सही 0.60 टक्क्यांच्या घसरणीसह 479.15 रुपयांवर बंद झाले.


80 हजार कोटींहून अधिक गुंतवणूक


अयोध्येच्या संपूर्ण बदलाची तयारी सुरू आहे. केवळ टाटा समूहच नाही तर देशातील इतर समूह आणि हॉटेल कंपन्याही येथे गुंतवणूक करत आहेत. रिअॅलिल्टी क्षेत्रातही प्रचंड गुंतवणूक होत आहे. या शहरात 25 हजार कोटी रुपयांचे ग्रीनफिल्ड सिटी उभारण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ तयार आहे. रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. एकूणच शहरात 10 अब्ज डॉलर्स म्हणजेच 80 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक होणार आहे. त्यामुळे राज्याच्या वार्षिक उत्पन्नात 25 हजार कोटींची वाढ अपेक्षित आहे. 


ही बातमी वाचा: