मुंबई : देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि सामाजिक हितासाठी कायम एक पाऊल पुढे ठेऊन काम करणारे रतन टाटा (Ratan Tata) यांचे बुधवारी रात्री पावणे 12 वाजताच्या सुमारास निधन झाले. रतट टाटांच्या निधनानंतर देशभरातून शोक व्यक्त करण्यात आला, कोट्यवधि भारतीयांचे डोळे पाणावले. देशभरातून सोशल मीडियाच्या माध्यमातून रतन टाटांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते सर्वसामान्य भारतीयांनीही त्यांच्या आठवणी जागवत शोक व्यक्त केला. आता, त्यांच्या निधनाच्या तिसऱ्या दिवशीही रतन टाटांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. भाजप नेत्या आणि आमदार पंकजा मुंडेंनी आज दसरा मेळाव्यानंतर रतन टाटांना श्रद्धांजली अर्पण करुन शोक व्यक्त केला. तर, सोशल मीडियावर (Social media) एक व्हिडिओ व्हायरल होत असून गुजरातमधील एका व्यापाऱ्याने तब्बल 1100 डायमंड वापरुन रतन टाटांचे हिरेजडीत पोट्रेट बनवले आहे.
सूरतमधील एका व्यापाऱ्याने रतन टाटा यांचे पोट्रेट चित्र साकारले आहे, विशेष म्हणजे टाटांचे हे चित्र चक्क डायमंड म्हणजेच हिऱ्यांनी साकारण्यात आलं आहे. सोशल मीडियावर सध्या हे पोट्रेट बनवतानाचा संबंधित व्यापाऱ्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्यापाऱ्याच्या कलाकृतीचं कौतूक होत असून बारकाईने रतन टाटांचे चित्र साकारले आहे. विशेष म्हणजे 1100 अमेरिकन डायमंडचा वापर करुन हे पोट्रेट बनवण्यात आलंय. सध्या हे पोट्रेट सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत असून या कलाकाराचे व व्यापाऱ्याचे नेटीझन्सकडून कौतूक केलं जातंय.
ब्रीचकँडी रुग्णालयात निधन झाल्यानंतर रतन टाटा यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे पार्थीव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या NCPA मध्ये सकाळी 10 ते दुपारी चार पर्यंत ठेवण्यात आले होते. यावेळी रतन टाटा विविध धर्मातील धर्मगुरुंनी अंत्यदर्शन घेतले. टाटांच्या अंत्यदर्शनासाठी आलेल्या अनेकांचा अश्रूंचा बांध फुटलेला पाहायला मिळाला. रतन टाटांच्या पार्थिवावर वरळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दिग्गजांनी उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिल. तसेच, सर्वसामान्य नागरिकांनीही वरळी स्मशानभूमीत मोठी गर्दी केली होती, तर मुंबई पोलिसांकडून त्यांना मानवंदना देण्यात आली.
नोएल टाटा रतन टाटांचे उत्तराधिकारी
रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांचे सावत्र बंधू नोएल टाटा यांची टाटा ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यामुळे, ते रतन टाटा यांचे उत्तराधिकारी ठरले आहेत. टाटा ट्रस्टच्या (11 ऑक्टोबर) बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. टाटा ट्रस्टचं अध्यक्षपद हे मोठं आहे, तेवढीच त्या पदाची मोठी जबाबदारी आहे. टाटा हे नाव एक ब्रँड आहे आणि हाच ब्रँड आणखी मोठा करण्यासाठी नोएल टाटा प्रयत्नशील असतील. दरम्यान, नोएल टाटा हे अनेक अर्थांनी या पदासाठी पात्र आणि सामर्थ्यशाली चेहरा आहेत. त्यांनी टाटा समूहात आतापर्यंत अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या नेतृत्त्वात टाटा हे नाव आणखी मोठं होण्यास मदत झालेली आहे.
हेही वाचा
Video : बिग बॉसने तुला कसं बोलवलं?; अजित पवारांचे बरेच प्रश्न, सूरजचं उत्तर ऐकून दादा पोट धरुन हसले