Ram Mandir : संपूर्ण देश 22 जानेवारीची वाट पाहत आहे. हा दिवस एक ऐतिहासीक दिवस असणार आहे. या दिवशी राम मंदिराचा (Ram Mandir)  उद्घाटन सोहळा होणार आहे. .पण या राम मंदिर उद्घाटनामुळं आसपासच्या जिल्ह्यांच्या विकासाच्या गतीला एक बूस्टर डोस मिळाला आहे. तेथील हॉटेल उद्योग, छोटे व्यापारी आणि स्थानिक उद्योग आता जागतिक पातळीवर आपला ठसा उमटवणार आहेत. यातून लाखो लोकांना रोजगार मिळेल. त्यामुळेच हॉटेल उद्योगात मोठ्या गुंतवणुकीसाठी अनेक करार केले जात आहेत. एका अहवालानुसार, भारतातील प्रसिद्ध हॉटेल कंपन्या अयोध्येत त्यांच्या शाखा उघडत आहेत. सध्या शहरात सुमारे 50 मोठ्या हॉटेलचे बांधकाम प्रकल्प सुरु आहेत.


18,000 कोटी रुपयांची गुंतवणूक


हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि होमस्टेमध्ये गुंतवणुकीमुळे अयोध्या हॉटेल उद्योगाचे नवे केंद्र म्हणून उदयास येत आहे. याशिवाय चांगले महामार्ग आणि रस्ते, रामाचे जीवन दर्शविणारी भिंतींवरची चित्रे, सजावट आदींमुळे अयोध्येचे आकर्षण वाढत आहे. अयोध्येचे विभागीय आयुक्त गौरव दयाल म्हणाले की, ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट (GIS) दरम्यान अयोध्येतील पर्यटनासाठी सुमारे 18,000 कोटी रुपयांच्या 102 करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. जीआयएसनंतरही अनेक व्यावसायिक अयोध्येतील पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी सरकार आणि जिल्हा प्रशासनाकडे आपले प्रस्ताव पाठवत आहेत.


मोठ्या कंपन्या पैसे गुंतवण्यात आघाडीवर 


सध्या अयोध्येत पर्यटनाशी संबंधित 126 प्रकल्प पूर्ण होणार आहेत. त्यापैकी 46 मध्ये सामंजस्य करार झाले आहेत, तर 80 नॉन एमओयू आहेत. या सर्व 126 प्रकल्पांची एकूण किंमत सुमारे 4,000 कोटी रुपये आहे. सुमारे 50 प्रसिद्ध हॉटेल कंपन्यांनी अयोध्येत मोठ्या प्रकल्पांमध्ये गुंतवणूक केली आहे. यामध्ये ताज, मॅरियट, जिंजर, ओबेरॉय, ट्रायडेंट आणि रॅडिसन यांचा समावेश आहे. बांधकामाचे काम लवकरच पूर्ण होईल. 'राजाची इमारत' हेरिटेज हॉटेल म्हणून विकसित करण्याचीही योजना आहे. एक मोठा हॉटेल समूह या प्रकल्पात गुंतवणूक करण्यास इच्छुक आहे. अयोध्येतील हॉटेल उद्योगात चार मोठ्या प्रकल्पांतर्गत सुमारे 420 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. या यादीतील पहिला क्रमांक Panche Dreamworld LLP आहे, जो 140 कोटी रुपये खर्चून 'O Rama Hotels and Resorts' प्रकल्प उभारणार आहे.


भाड्यात झाली मोठी वाढ


इंदिवर रस्तोगी, ग्लोबल बिझनेस ट्रॅव्हल, थॉमस कूक (इंडिया) आणि एसओटीसी ट्रॅव्हलचे अध्यक्ष आणि ग्रुप हेड यांनी अहवाल दिला आहे की, अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाच्या घोषणेने, ग्राहकांकडून मोठ्या प्रकारची मागणी येत आहे. याबाबत लोकांची उत्सुकता वाढल्याचे संकेत मिळत आहेत. महामारीच्या आधीच्या तुलनेत सर्व विभागांमध्ये 400 टक्के वाढ झाली आहे. मागणी लक्षात घेता मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगळुरु, हैदराबाद आणि चेन्नई या केंद्रांपासून अयोध्यापर्यंतचे हवाई भाडे 20 हजार रुपयांवरून 30 हजार रुपयांवर पोहोचले आहे. 22 जानेवारीच्या आठवड्यात अयोध्येसाठी थेट परतीचे भाडे जवळपासच्या लखनौ, प्रयागराज, वाराणसी आणि गोरखपूर शहरांच्या सरासरी भाड्यापेक्षा 30 ते 70 टक्के जास्त आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Ayodhya Ram Mandir : राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचा सर्वत्र जल्लोष; सोनगीरच्या तांब्याचे प्रभू श्रीरामाच्या दारी