Bank Holiday : प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर पुढील आठवड्यात म्हणजे 22 जानेवारीला राम मंदिराचा (Ram Mandir) उद्घाटन सोहळा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi), उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक मान्यवर या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होणार आहेत. दरम्यान, या सोहळ्यानिमित्त देशातील बँका बंद राहणार का? किंवा कोणत्या राज्यातील बँका बंद राहणार याबाबतची माहिती पाहुयात.


22 जानेवारीला उत्तर प्रदेशमध्ये बँकांना सार्वजनिक सुट्टी


22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांनी 22 जानेवारीला सुट्टी जाहीर केली आहे. उत्तर प्रदेशातही 22 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी म्हणजेच सरकारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भात शासनाकडून परिपत्रक जारी करण्यात आले आहे. 22 जानेवारीला म्हणजेच सोमवारी बँकांना सुट्टी असल्यामुळं पुढील आठवड्यात उत्तर प्रदेशात फक्त दोन दिवस बँका सुरू राहतील. 21 जानेवारीला रविवार असल्यानं देशभरातील बँका बंद राहणार आहेत. 22 जानेवारीला राम मंदिर उत्सवानिमित्त बँकेला सुट्टी असेल. त्यानंतर, मंगळवार, 23 जानेवारी आणि बुधवार, 24 जानेवारी रोजी बँकांमध्ये कामकाज होईल.


सलग चार दिवस सुट्या


हजरत मोहम्मद अली यांच्या जयंतीनिमित्त गुरुवार, 25 जानेवारी रोजी बँकेला सुट्टी असणार आहे. त्यानंतर प्रजासत्ताक दिनानिमित्त दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवार 26 जानेवारीला बँका बंद राहतील. 27 जानेवारी हा महिन्याचा चौथा शनिवार आहे आणि त्यानंतर 28 जानेवारी रविवार आहे. 25 जानेवारी ते 28 जानेवारी असे सलग चार दिवस बँका बंद राहणार आहेत. 21 जानेवारीपासून पुढील आठ दिवस बँका फक्त 2 दिवस सुरू राहतील आणि 6 दिवस सुट्या असतील.


सुट्टीबाबत सोशल मीडियावर एक परिपत्रक 


22 जानेवारीला बँक सुट्टीबाबत एक परिपत्रक सोशल मीडियावर शेअर केले जात आहे. परिपत्रकात असे म्हटले जात आहे की निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स अॅक्ट 1881 अंतर्गत 22 जानेवारीला उत्तर प्रदेशमध्ये सर्व बँका बंद राहतील. म्हणजेच 22 जानेवारीला सरकारी बँकांसह खासगी बँकाही बंद राहतील.


अशा प्रकारे तुम्ही बँकिंगचे काम करू शकाल


बँकांना वारंवार सुट्ट्या आल्यानं सर्वसामान्यांना बँकेच्या कामकाजात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अशा परिस्थितीत ज्यांना आर्थिक कामे करायची आहेत, त्यांना ऑनलाइन सुविधांची मदत मिळणार आहे. या काळात लोक पैसे काढण्यासाठी एटीएम वापरू शकतात. पैसे ट्रान्सफर करण्यासाठी तुम्ही UPI, नेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंग वापरू शकता. बँकांच्या मोबाईल आणि इंटरनेट बँकिंग सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहतील.


'या' दिवशी बँका राहणार बंद 


21 जानेवारी 2024- रविवारमुळे देशभरातील बँकांना सुट्टी असेल
22 जानेवारी 2024- इमोइनू इराप्टामुळे इम्फाळमध्ये बँका बंद राहतील, तसेच उत्तर प्रदेशमध्ये राम मंदिर उद्घाटन सोहळ्यामुळं बँका बंद राहतील.
23 जानेवारी 2024- इंफाळमध्ये गाणे आणि नृत्यामुळे बँकेला सुट्टी असेल.
25 जानेवारी 2024- थाई पोशम/हजरत मोहम्मद अली यांच्या वाढदिवसानिमित्त चेन्नई, कानपूर आणि लखनऊ येथील बँकांना सुट्टी असेल.
26 जानेवारी 2024- प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात बँका बंद राहतील.
27 जानेवारी 2024- चौथ्या शनिवारमुळे देशभरातील बँकांना सुट्टी असेल.
28 जानेवारी 2024- रविवारमुळे बँक बंद राहणार आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Bank Holidays : फेब्रुवारीमध्ये सुट्ट्याच सुट्ट्या! 'इतके' दिवस बँका राहणार बंद; बँकेच्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी तपासा