पुणे : देशात सध्या सगळीकडे राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेची (Ayodha Ram Mandir) प्रतिक्षा आहे. त्यात अनेक रामभक्त अयोध्येला जाण्यासाठी आतुर आहे. रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर काही दिवसांत हे मंदिर सगळ्या रामभक्तांमना दर्शनासाठी खुलं करण्यात येणार आहे. राम भक्तांना सहज अयोध्येत पोहचून रामल्ललाचं दर्शन घेता यावं यासाठी रेल्वेनं पुढाकार घेतला आहे. रामभक्तांसाठी आता पुण्यातून 15 विशेष गाड्या सोडण्यात येणार आहे. रेल्वे प्रशासनाने 30 जानेवारीपासून पुणे ते अयोध्येसाठी 15 विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे. दर दोन दिवसांनी एक ट्रेन पुण्याहून अयोध्येसाठी निघेल.
भारतीय रेल्वेने प्रभू रामभक्तांसाठी 200 विशेष ट्रेन चालवण्याची घोषणा केली आहे. योध्येला जाण्यासाठी भाविकांनी विशेष गाड्यांची मागणी केली होती. त्यानुसार 30 जानेवारीपासून पुणे ते अयोध्येसाठी 15 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सर्व गाड्या स्लीपर कोच असणार आहेत. पुणे-अयोध्या-पुणे रेल्वे सेवेसाठी तीन रॅकचा वापर केला जाण्याची शक्यता आहे. अयोध्येहून पुण्याला जाण्यासाठी 15 विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. एका गाडीतून सुमारे दीड हजार प्रवासी अयोध्येला जाऊ शकतील. लवकरच या गाड्यांचे बुकिंग सुरू होणार आहे. या गाड्यांना मिळणारा प्रतिसाद पाहून विशेष गाड्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. पुण्यातून नेमक्या कोणत्या गाड्या धावणार याची माहिती येत्या काही दिवसात जाहीर होणार आहे.
देशभरातून 200 विशेष गाड्या
रेल्वे आस्था ट्रेनच्या नावाने देशभरातून 200 विशेष गाड्या धावणार आहे. यात दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गोवा, तेलंगणा, जम्मू-काश्मीर येथून अयोध्येला जाण्यासाठी आस्था स्पेशल ट्रेनची सोय करण्यात आली आहे. या ट्रेनच्या माध्यामातून लाखो लोक अयोध्येला जाऊ शकणार आहेत.
दिल्ली
नवी दिल्ली स्टेशन – अयोध्या – नवी दिल्ली स्टेशन
आनंद विहार - अयोध्या - आनंद वियार
निजामुद्दीन - अयोध्या - निजामुद्दीन
जुने दिल्ली रेल्वे स्थानक – अयोध्या धाम - जुनी दिल्ली रेल्वे स्थानक
गुजरात
उधना – अयोध्या – उधना
इंदूर - अयोध्या - इंदूर
महेसाणा - सालारपूर - महेसाणा
वापी - अयोध्या - वापी
वडोदरा - अयोध्या – वडोदरा
पालनपूर - सालारपूर - पालनपूर
वलसाड - अयोध्या - वलसाड
साबरमती - सालारपूर - साबरमती
मध्य प्रदेश
इंदूर - अयोध्या - इंदूर
बीना - अयोध्या - बीना
भोपाळ – अयोध्या – भोपाळ
जबलपूर - अयोध्या – जबलपूर
मुंबई – अयोध्या – मुंबई
नागपूर – अयोध्या – नागपूर
पुणे – अयोध्या – पुणे
वर्धा – अयोध्या – वर्धा
जालना – अयोध्या – जालना
गोवा – 1 आस्था स्पेशल
तेलंगणा
सिकंदराबाद - अयोध्या - सिकंदराबाद
काजीपेट जंक्शन - अयोध्या - काजीपेट जंक्शन
तामिळनाडू
चेन्नई – अयोध्या – चेन्नई
कोईम्बतूर - अयोध्या – कोईम्बतूर
मदुराई – अयोध्या – मदुराई
सालेम - अयोध्या - सालेम
जम्मू-काश्मीर
जम्मू-अयोध्या-जम्मू
कटरा - अयोध्या - कटरा
इतर महत्वाची बातमी-
इतर महत्वाची बातमी-