Ram Mandir Inauguration and Share Market:  सोमवारी, 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येच्या राम मंदिरात (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. एकीकडे रामलल्ला मंदिरात विराजमान होणार आहेत.तर दुसरीकडे त्याचा परिणाम शेअर मार्केटवरही दिसू शकतो.किंबहुना, अयोध्येशी संबंधित या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी असल्याचे दिसून येत आहे. राम मंदिरांच्या उद्घाटनानंतर या पाच कंपन्यांच्या शेअर दरात तेजी येऊ शकते. 


इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड (IHCL)


अयोध्येतील राम मंदिर आणि येथे येणार्‍या भाविकांना सुविधा देण्यासाठी, देशातील सर्वात जुन्या व्यावसायिक घराण्यांपैकी एक असलेल्या टाटा समूहाच्या हॉस्पिटॅलिटी कंपनी इंडियन्स हॉटेल लिमिटेडने येथे दोन आलिशान हॉटेल्स बांधण्याची योजना आखली आहे.त्याची घोषणा झाल्यापासून कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. मागील आठवड्यात शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी इंडियन हॉटेल्स कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त वाढ झाली आणि तो 4.18 टक्क्यांच्या उसळीसह 483 रुपयांच्या पातळीवर बंद झाला. या शेअरने गेल्या एका महिन्यात 13 टक्के, सहा महिन्यांत 23 टक्के, एका वर्षात 62 टक्के आणि पाच वर्षांत 262 टक्के परतावा दिला आहे. सध्या कंपनीच्या शेअरने 483 रुपयांची पातळी गाठली आहे.


अपोलो सिंदुरी हॉटेल्स  (Apollo Sindoori Hotels)


हॉटेल क्षेत्राशी संबंधित अन्य कंपनीच्या शेअर्समध्येही वाढ दिसून येईल.चेन्नईची ही फर्म 3,000 चौरस मीटरमध्ये पसरलेल्या अयोध्येत येणाऱ्या लोकांसाठी मल्टी लेव्हल पार्किंग बनवत आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) वर सूचीबद्ध असलेल्या या कंपनीच्या शेअर्समध्येही गेल्या काही दिवसांत चांगली वाढ झाली आहे. एका महिन्यात अपोलो सिंदूरी हॉटेल्सचे शेअर्स 48 टक्क्यांनी वाढले आहेत. त्याच वेळी, गेल्या सहा महिन्यांत 74 टक्के, एका वर्षात 78 टक्के आणि पाच वर्षांत 140 टक्के परतावा गुंतवणूकदारांना दिला आहे. सध्या कंपनीचा शेअर 2285 रुपयांवर व्यवहार करत आहे.


लार्सेन अॅण्ड टुब्रो (L&T)


राम मंदिराच्या अभिषेकच्या दुसऱ्या दिवशी हा स्टॉक मोठी उसळी घेण्याची शक्यता आहे. अयोध्येत राम मंदिर बांधण्याचे काम या कंपनीकडे आहे. या कंपनीचे मार्केट कॅप 4.99 लाख कोटी रुपये आहे. ही कंपनी मंदिर बांधत आहे आणि टाटा समुहाची आणखी एक कंपनी, टाटा कन्सल्टन्सी इंजिनिअर्स या कंपनीला मदत करत आहे. L&T कंपनीच्या शेअर्स दरामध्ये सातत्याने  वाढ होत आहे. शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी हा शेअर 1.15 टक्क्यांनी वाढून 3627.40 रुपयांवर बंद झाला. गेल्या सहा महिन्यांत 47 टक्के आणि एका वर्षात 63 टक्के परतावा दिला आहे. गेल्या पाच वर्षांत या शेअरमधून मिळालेला परतावा 183 टक्के आहे.


प्रवेग लिमिटेड (Praveg Ltd Share)


प्रवेग लिमिटेड ही कंपनी पर्यटन स्थळांवर आलिशान तंबू बनवण्याचे काम आहे. अयोध्या राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याआधीच कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना चांगलाच परतावा दिला आहे. गेल्या एका महिन्यात कंपनीच्या समभागांनी 63 टक्क्यांचा मजबूत परतावा दिला आहे. गेल्या सहा महिन्यांच्या कामगिरीवर नजर टाकली तर कंपनीच्या शेअरच्या किमतीत 127 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2440 कोटी रुपयांचे मार्केट कॅप असलेल्या या कंपनीने नोव्हेंबर 2023 मध्ये अयोध्येत लक्झरी रिसॉर्ट उघडले होते. ही कंपनी लक्झरी टेंट सिटी विकसित करते आणि अयोध्येतही ही कंपनी रामजन्मभूमीच्या आसपास टेंट सिटी विकसित करणार आहे. यासोबतच ही कंपनी लक्षद्वीपमध्ये पर्यटन शहर विकसित करण्याचा विचार करत आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये एका वर्षात सुमारे 200 टक्के वाढ झाली आहे आणि पाच वर्षांत 44,000 टक्क्यांहून अधिक वेगाने वाढ होण्याची शक्यता आहे. 


आयआरसीटीसी लिमिटेड (IRCTC Share) 


रेल्वेशी संबंधित या  कंपनीने गुंतवणूकदारांना चांगलाच परतावा दिला आहे. मागील आठवड्यात शनिवारी 10.70 टक्क्यांच्या तेजीसह 1026.40  रुपयांवर बंद झाला. हा दर आतापर्यंतचा सर्वकालिक उच्चांक आहे. आयआरसीटीसी लिमिटेड कंपनी ही धार्मिक आणि  अन्य पर्यटन स्थळांसाठीची ऑनलाईन तिकीट बुकिंगची सुविधा देते. सध्या आस्था स्पेशल ट्रेन चालवण्याची जबाबदारी या कंपनीकडे आहे.अयोध्येकडे भाविकांचा ओढा वाढणार असून त्यादृष्टीने अधिक आणि विशेष ट्रेन चालवण्यात येणार आहेत. मागील एका महिन्यात IRCTC च्या शेअर्सने 19 टक्क्यांचा परतावा दिला आहे. मागील सहा महिन्यात 65 टक्के आणि पाच वर्षात 558 टक्क्यांचा परतावा कंपनीने दिला आहे. 


(Disclaimer : ही बातमी वाचकांच्या माहितीसाठी असून शेअर बाजाराविषयक सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखीम पूर्ण असून तज्ज्ञांच्या सल्ल्याने गुंतवणूक करावी.)