Rakesh Jhunjhunwala Portfolio: शेअर बाजारात मोठी घसरण झाली असताना दुसरीकडे 'बिग बुल' राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमधील एका स्टॉकचा भाव चांगलाच वधारला. जवळपास 13 टक्क्यांनी या शेअरचा दर वाढला. इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्समध्ये ही वाढ झाली. बाजारातील व्यवहाराच्या सुरुवातीला इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्सच्या शेअरचा दर कमी होत होता. मात्र, त्यानंतर शेअरचा दर वाढू लागला. या शेअरने 250 रुपयांचा ब्रेकआउट देताना 259.80 रुपये इतका सर्वाधिक दरही गाठला होता.
शेअर बाजारातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्सच्या शेअर दरात वाढ होण्यामागे दोन प्रमुख कारणे आहेत. एक म्हणजे कंपनीच्या प्रवर्तकांनी आपली भागिदारी 10 टक्क्यांनी कमी केली. तर, ब्रिकवर्क रेंटिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स कंपनीचे रेटिंग नकारात्मकहून स्थिर अशी केली.
कंपनीचे प्रवर्तक आपला हिस्सा 10 टक्क्यांपेक्षा कमी करणार असल्याचे, वृत्त होते. या वृत्तावर कंपनीने कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. मात्र, दोन दिवसानंतर शेअर बाजारात या वृत्तावर प्रतिक्रिया दिसून आली. ब्रिकवर्क रेटिंग्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स कंपनीचे रेटिंग अपग्रेड केल्यानंतर शेअर बाजाराला याची माहिती दिली.
कंपनीच्या प्रवर्तकांनी आपला हिस्सा 10 टक्क्यांनी कमी केल्यानंतर इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स कंपनी आणखी व्यावसायिक कंपनी होईल असे म्हटले जात आहे. सीईओद्वारे संचलित असणारी एक कंपनी आपल्या व्यवसायात आणखी पारदर्शकता आणेल असे म्हटले जात आहे.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने दिली जात आहे. बाजारातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. ABPLive.com च्या माध्यमातून येथे कोणालाही पैसे गुंतवण्याचा सल्ला दिला जात नाही.)
शेअर बाजाराला 'कोविड बाधा'! सेन्सेक्स 1300 अंकांनी कोसळला, दोन तासांत 6 लाख कोटींचे नुकसान
कपडे धुणे महागणार; साबण आणि डिटर्जंट पावडरच्या किंमतीत मोठी वाढ
स्टॉक गुरू गुजराल म्हणतात, पैसा सर्वस्व नाही, राकेश चालू शकत नाही आणि मी...