Railway Travel Insurance: भारतातील लोकांसाठी रेल्वे हे प्रवासाचे (Railway Travel) मुख्य साधन आहे. दररोज करोडो भारतीय लोक रेल्वेने प्रवास करतात. रेल्वे प्रवासादरम्यान जर अपघातात कोणाचा मृत्यू झाला तर त्याच्या नातेवाईकांना रेल्वे विभागाकडून मदत केली जाते. तसेच  रेल्वे अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना देखील उपचारासाठी मदत दिली जाते. जखमींना उपचारासाठी दोन लाख रुपयांची मदत मिळणार आहे. जाणून घेऊयात यासंबंधीची सविस्तर माहिती...


दररोज अनेक लोक रेल्वेने प्रवास करतात. अनेकांना हे देखील माहित असेल की तुमच्या ट्रेनच्या तिकिटावर विम्याचा उल्लेख आहे. रेल्वे प्रवासादरम्यान तुमचा मृत्यू झाला तर तुमच्या नॉमिनीला विमा कंपनीकडून भरपाई मिळते. पण रेल्वे अपघातात जखमी झाल्यास मदत मिळते का? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल. जखमींना विम्याचा लाभ मिळतो का? तर त्याचे उत्तर होय असे आहे. 


जेव्हा तुम्ही रेल्वेचे तिकीट बुक करता तेव्हा कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी तुमच्या तिकिटाचा विमा काढला जातो. ऑनलाइन तिकीट बुक केल्यानंतर, तुम्हाला एक ईमेल प्राप्त होईल. ज्यामध्ये विम्याचा तपशील असतो. 


रेल्वे प्रवासादरम्यान जखमी झाल्यास उपचारासाठी दोन लाख रुपये मिळणार 


प्रवासादरम्यान तुम्हाला दुखापत झाल्यास विमा कंपनी तुमच्या उपचाराचा खर्च उचलते. जखमी व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर त्याच्या उपचारासाठी आवश्यक असलेली 2 लाख रुपयांपर्यंतची रक्कम विमा कंपनी देते. जर एखादी व्यक्ती अंशतः अपंग असेल तर ही रक्कम 7.5 लाख रुपयांपर्यंत वाढते. भारतीय रेल्वे वेळोवेळी लोकांना या सुविधांबद्दल जागरूक करते.


अपघातात व्यक्ती पूर्णपणे अपंग झाल्यास 10 लाखांची मदत


रेल्वे प्रवासादरम्यान अपघातात एखादी व्यक्ती पूर्णपणे अपंग झाल्यास, त्या प्रकरणात 10 लाख रुपयांची भरपाई दिली जाते. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला विम्याचा लाभ हवा असेल, तर तुम्हाला तिकीट बुक करताना एका पर्यायावर क्लिक करावे लागेल. यामध्ये असे सांगावे लागेल की होय, मला विम्याची सुविधा हवी आहे. तिकीट बुक करताना तुम्ही तुमच्या नॉमिनीचा तपशील भरावा. असे न केल्यास नुकसान भरपाई मिळण्यात अडचण येऊ शकते.


रेल्वे अपघातात मृत्यू झाल्यास नातेवाईकांना मिळणार 10 लाखांची मदत


रेल्वे अपघातात जर एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याला किती पैसे मिळतील? प्रवासादरम्यान अपघात किंवा आपत्तीमुळे एखाद्याचा मृत्यू झाल्यास, मृताच्या नातेवाईकांनी 10 लाख रुपयांची भरपाई दिली जाते. या स्थितीतही, भरपाईची सुविधा मिळविण्यासाठी नामनिर्देशित व्यक्तीचे तपशील भरणे आवश्यक आहे. जर तुम्ही असे केले नाही तर तुमच्या निधनानंतर कुटुंबाला नुकसान भरपाई मिळणे कठीण होते. ही सुविधा फक्त प्रवासासाठी आहे. म्हणजे ज्या स्थानकावरून तुम्ही प्रवास सुरू करता आणि तो कुठे संपतो. तुमच्या शेवटच्या स्थानकानंतर कोणतीही आपत्ती आल्यास ही सुविधा उपलब्ध होणार नाही.


महत्त्वाच्या बातम्या:


पोर्टलवर गाडी रद्द, ऑनलाईन बुकिंगही बंद, गाडी मात्र सुसाट तीही विनाप्रवासी; रेल्वेचा भोंगळ कारभार अन् प्रवासी-कर्मचारी संभ्रमात