IRTC Profit : रेल्वे कंपनीसाठी (Railway Comapny) एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. मागील तीन महिन्यात रेल्वे कंपनीने (Railway Comapny) मोठा नफा (Profit) मिळवला आहे. याचा मोठा फायदा गुंतवणूकदारांना देखील होणार आहे. कारण झालेल्या नफ्यानंतर कंपनीनं गुंतवणूकदारांना 4 रुपयांचा लाभांश जाहीर केलाय. प्रचंड तिकीट विक्रीमुळं आयआरसीटीसीला (IRTC) मोठे उत्पन्न मिळाले आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.


गुंतवणुकदारांना कंपनीनं 4 रुपयांचा लाभांश जाहीर 


IRTC नुकतचे मार्च तिमाहीच्या उत्पन्नाच्या बाबतीमधील आकडेवारी जाहीर केलीय. यामध्ये कंपनीच्या निव्वळ नफ्याबद्दल सविस्तर माहिती दिलीय. मागील तीन महिन्यात कंपनीला निव्वळ नफा हा  284 कोटी रुपयांचा मिळाला आहे. नफ्यात वाढ झाल्यामुळं कंपनीनं गुंतवणुकदारांना एक दिलासा देणारी बातमी दिली आहे. गुंतवणुकदारांना कंपनीनं 4 रुपयांचा लाभांश जाहीर केलाय. 


रेल्वेचा प्रवास हा सुखकर आणि आरामदायी 


रेल्वेचा प्रवास हा सुखकर आणि आरामदायी मानला जातो. दररोज भारतीय रेल्वेने लाखो लोक प्रवास करतात. ज्याचा थेट फायदा कंपनीला होतो. अलीकडेच, भारतीय रेल्वे कंपनी IRCTC ने त्यांचे तिमाही निकाल सादर केले आहेत. निकालानुसार कंपनीने या कालावधीत मोठी कमाई केली आहे. कंपनीच्या प्रचंड कमाईमागील कारण म्हणजे तिकीट विक्रीतील झालेली मोठी वाढ. IRCTC ने FY 24 च्या मार्च तिमाहीत 284 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत हे प्रमाण दोन टक्क्यांनी अधिक आहे. त्यानंतर कंपनीने गुंतवणूकदारांसाठी 4 रुपयांचा लाभांशही जाहीर केलाय.  


गुंतवणुकदारांना लाभांश देण्यासाठी कंपनी किती पैसे खर्च करणार?


दरम्यान, मिळालेल्आ माहितीनुसार IRCTC ने अद्याप लाभांशाची रेकॉर्ड डेट जाहीर केलेली नाही. लाभांश देण्यासाठी कंपनी 256 कोटी रुपये खर्च करणार आहे. आर्थिक वर्ष 24 साठी कंपनीकडून हा अंतिम लाभांश असेल. त्याचबरोबर या कंपनीत सरकारची 62.4 टक्के भागीदारी आहे. आज बाजार उघडताच IRCTC चे शेअर्स 4 टक्क्यांच्या घसरणीसह 1032.80 रुपयांवर व्यवहार करत होते. कंपनीचे मार्केट कॅप 87,152 कोटी रुपये झाले आहे. या शेअरने गेल्या 3 महिन्यांत 19 टक्के परतावा दिला आहे. त्याच वेळी, त्यात 1 महिन्यात 5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 


वाढत्या तिकीट विक्रीचा कंपनीला मोठा फायदा, महसुलात मोठी वाढ


रेल्वेच्या तिकीट विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. रोज लाखो लोक रेल्वेनं प्रवास करत आहेत. यामुळं रेल्वेच्या उत्पन्नात मोठी वाढ होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार कंपनीच्या महसुलात 20 टक्क्यांची वाढ झाली आहे. मार्च तिमाहीत तो 1154 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.


महत्वाच्या बातम्या: