Sangli Crime News : सांगली पोलिसांनी (Sangli Police) मोठी कारवाई केली आहे. बनावट नोटा बनवणार्‍या कारखान्यावर छापा टाकत, सांगली पोलिसांनी 1 लाख 90 हजार रुपयांच्या बनावट नोटा (fake notes) जप्त केल्या आहेत. जुन्या पद्धतीच्या  50 रुपयांच्या बनावट नोटा बनवल्या जात होत्या. यावेळी पोलिसांनी मशिनरीसहीत 3 लाख 90 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान, याप्रकरणी सांगली पोलिसांनी एकास अटक केली आहे. अहद महंमद अली शेख असे संशयीत आरोपीचं नाव आहे. 


कारवाईत तब्बल 1 लाख 90 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त


सांगलीतील मिरजमध्ये बनावट नोटा बनवणार्‍या कारखान्यावर छापा टाकून पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी एकास अटक केली आहे. अहद महंमद अली शेख असे त्याचे नाव आहे. सांगली शहर पोलिसांनी ही कारवाई केलीय. या कारवाईत तब्बल 1 लाख 90 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. संशयित अहद शेख हा बनावट नोटा वापरात आणण्याासाठी सांगली बस स्थानकात येणार असल्याची माहिती सांगली शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून अहद शेख यास अटक केली. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 50 रुपयांच्या जुन्या पद्धतीच्या बनावट नोटा असल्याचे निदर्शनास आले. यानंतर त्याने मिरजेत बनावट नोटांचा कारखानाच थाटल्याची बाब समोर आली होती.


30 टक्के कमीशनवर या नोटा व्यवहारात आणण्यासाठी वापर


दरम्यान, पोलिसांनी छापा टाकून बनावट नोटा बनविणार्‍या कारखान्याचा पर्दाफाश केला. विशेष म्हणजे हा कारखाना मिरज शहर पोलिस ठाण्याच्या काही अंतरावरच थाटण्यात आला होता. या  कारखान्यातून पोलिसांनी 50 रुपयांच्या जुन्या पद्धतीच्या 100 नोटांचे 38 बंडल जप्त केले. तसेच अहद शेख हा 20 आणि 10 रुपयांच्या देखील जुन्या पद्धतीच्या बनावट नोटा बनवत असल्याचे समोर आलं आहे. या नोटा बनवण्यासाठी वापरण्यात आलेले मशिन, कागद, लॅमीनेटर, नोटा कटींग करण्याठी वापरण्यात येणारे मशीन असे एकूण बनावट नोटांसह  3 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अहद शेख हा 30 टक्के कमीशनवर या नोटा व्यवहारात आणण्यासाठी अनेकांना देत होता. त्यामध्ये अहद शेख याला मदत केलीय. त्याने कोठे-कोठे बनावट नोटा व्यवहरात आणल्यात याचा देखील सांगली शहर पोलिस तपास करीत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली. 


महत्वाच्या बातम्या:


Fake Currency : नाशकात सलग दुसऱ्या दिवशी बनावट नोटा सापडल्याने खळबळ, मोठं रॅकेट उघड होणार?