Bank of Maharashtra: बँक ऑफ महाराष्ट्रने चालू आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये आपल्या नफ्यात 25 ते 30 टक्के वाढ करण्याचे लक्ष ठेवले आहे. निव्वळ व्याज उत्पन्नात (NII) वाढ आणि बुडीत कर्जाच्या तरतुदीत कपात केल्यामुळे नफ्यात चांगली वाढ साधण्यात यश आल्याचे बँकेने म्हटले आहे. मागील आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये, बँकेने 1,150 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. जो मागील आर्थिक वर्ष 2020-21 मधील 550 कोटी रुपयांच्या दुप्पट आहे.


एनपीए झाला कमी 


बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) एएस राजीव यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे की, या आर्थिक वर्षात आमचा निव्वळ नफा आणखी वाढेल. गेल्या वर्षी आम्ही मालमत्तेची गुणवत्ता सुधारण्यासाठी ऑपरेटिंग नफ्यापेक्षा जास्त तरतूद केली होती. आता आमचा एनपीए एक टक्क्याने खाली आला आहे. याशिवाय सकल एनपीएही चार टक्क्यांपेक्षा कमी आहे.


नफा 25 ते 30 टक्क्यांनी वाढेल


राजीव म्हणाले, आता बुडीत कर्जासाठी आणखी तरतूद करण्याची गरज भासणार नाही. यामुळे आमचा नफा आपोआप वाढेल. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 2022-23 मध्ये आमचा निव्वळ नफा 25 ते 30 टक्क्यांनी जास्त असेल, असा माझा अंदाज आहे.


7500 कोटींपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा 


निव्वळ व्याज उत्पन्नात वाढ झाल्यामुळे बँकेलाही नफ्यात वाढ होण्याची अपेक्षा आहे. निव्वळ व्याज उत्पन्न म्हणजे बँकांकडून कर्जावर आकारले जाणारे व्याज आणि ठेवींवर दिले जाणारे व्याज यांच्यातील फरक असते. राजीव म्हणाले, "चालू आर्थिक वर्षात निव्वळ व्याज उत्पन्न 20 टक्क्यांनी वाढून 7,500 कोटींपर्यंत पोहोचण्याची आमची अपेक्षा आहे." दरम्यान, गेल्या आर्थिक वर्षात बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न 6,044 कोटी रुपये होते, त्यात 23.42 टक्क्यांची वाढ झाली आहे. मागील आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये ते 4,897 कोटी रुपये होते.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Paisa Jhala Motha : वैद्यकीय विमा पोर्ट कसा कराल? इन्शुरन्स तज्ज्ञ सांगतात...  


IMF ने कबूल केली चूक; 2029 नाही, तर 2027 मध्ये भारत बनणार 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था