Prices of Pulses : सध्या सणासुदीचे दिवस आहेत. आता महत्वांच्या सणांना सुरुवात होणार आहे. त्यापूर्वीच सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. सणांआधीच काही वस्तूंच्या किंमती कमी झाल्या आहेत. महागाईनं दिलासा दिला आहे. सध्या डाळी आणि भाजीपाला स्वस्त झाला आहे. महिन्याभरात डाळी आणि भाजीपाल्यांची किंमती चार टक्क्यांनी कमी झाल्या आहेत.  


गेल्या महिनाभरात विविध डाळींच्या दरात लक्षणीय घट झाली आहे. घटलेली मागणी, वाढलेली आयात आणि विविध सरकारी उपाययोजनांमुळे डाळी स्वस्त झाल्या आहेत. गेल्या महिनाभरात डाळींच्या किमती चार टक्क्यांनी घसरल्याची माहिती सांगण्यात आली आहे.


'या' कारणांमुळं डाळी झाल्या स्वस्त 


डाळींच्या किंमतीबाबत इंडियन पल्सेस अँड ग्रेन्स तअसोसिएशनच्या हवाल्याने इकॉनॉमिक्स टाईम्सच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. गेल्या एका महिन्यात डाळींच्या किमती 4 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. आफ्रिकेतून तुरीच्या डाळीची वाढलेली आयात, कॅनडातून मसूर डाळीची वाढलेली आवक, सरकारने साठा मर्यादेवर केलेले कडक धोरण, हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात विक्री आणि चढ्या दराने घटलेली मागणी यामुळं डाळींच्या किंमतीत घट झाली आहे. या याबाबातची माहिती व्यापारी संघटनेनं दिली आहे. 


तुरीच्या डाळीच्या दरात मोठी घसरण 


इंडियन फार्मसी ग्रॅज्युएट्स असोसिएशन (Indian Pharmacy Graduates Association)  च्या मते, सध्या बाजारात तुरीच्या डाळीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. या डाळिच्या किंमती एका महिन्यात चार टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. त्याची किंमत कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे ट्रेडर्स आणि प्रोसेसरसाठी स्टोरेजची कमाल मर्यादा. तुरीच्या डाळीचे दर आणखी कमी होम्याची शक्यता आहे.


हरभरा आणि मसूरही स्वस्त 


तुरीच्या डाळीबरोबरच गेल्या महिनाभरात मसूर आणि हरभऱ्याची डाळ देखील स्वस्त झाली आहे.  हरभऱ्याच्या डाळीच्या दरात चार टक्क्यांची घसरण झाली आहे. याशिवाय मसूर डाळ दोन टक्क्यांहून अधिक स्वस्त झाली आहे. सरकार नाफेडच्या माध्यमातून चणाडाळ स्वस्तात विकत आहे. त्यामुळं हरभरा डाळीचे दरही आणखी कमी होण्याची शक्यता आहे. मसूराच्या बाबतीतही अशीच चिन्हे दिसत आहेत.


टोमॅटोच्या दरात मोठी घसरण 


डाळींसह भाजीपाला दरात देखील घसरण झाल्याचे दिसून येत आहे. जुलैमध्ये किरकोळ बाजारात 150 रुपये किलोच्या पुढे टोमॅटोचे दर गेले होते.  तर काही ठिकाणी किलोला 200 रुपयांचा दर मिळत होता. आता मात्र, टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सध्या किरकोळ बाजारात 15 ते 20 रुपये किलो दरानं टोमॅटो विकला जात आहे. घाऊक बाजारात टोमॅटोचे दर 3 ते 6 रुपये किलोपर्यंत खाली आले आहेत. पुढील दोन ते तीन आठवडे टोमॅटोच्या दरातही हाच कल राहणार आहे. याबाबत तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जुलैमध्ये भाव विक्रमी पातळीवर पोहोचल्यानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर टोमॅटोची लागवड केली. त्यामुळे आता टोमॅटोचा अधिक पुरवठा होत आहे. या कारणामुळं दरात घसरण होत आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


LPG Cylinder Price Cut : महागाई भार हलका होणार! आता 600 रुपयांना मिळणार एलपीजी सिलेंडर, केंद्र सरकारचा मोठा निर्णय