Fruit Pulses Price Hikes : सध्या देशात लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election) रणसंग्राम सुरु आहे. या काळात कोणत्याही प्रकारची महागाई होऊ नये यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. महागाई नियंत्रीत करण्यासाठी विविध प्रकारची धोरणं देखील आखत आहे. मात्र, काही वस्तूंची महागाई काही कमी होताना दिसत नाही. सध्या डाळींसह केळी (Banana), द्राक्षे (Grapes), पपईच्या (Papaya) दरात मोठी वाढ झालीय. त्यामुळं सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसतोय.
महिनाभरात डाळींच्या किंमतीत मोठी वाढ
महिनाभरात डाळींच्या किंमतीत मोठी वाढ झालीय. त्यामुळं सामान्य ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसतेय. फक्त डाळीच नाहीतर द्राक्षे, केळी आणि पपईच्या किंमतीत देखील वाढ झालीय. डाळीच्या किंमतीबाबत बोलायचे झाले तर तुरीच्या डाळीच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. तुरीच्या डाळीनं 170 रुपयांचा पल्ला गाठला आहे. त्यामुळं सर्वसामान्य नागरिकांना तुरीच्या डाळीची खरेदी परवडत नसल्याचे दिसून येत आहे. मागील दोन ते तीन दिवसात डाळीच्या किंमतीत सात आठ रुपयांची वाढ झालीय. तर महिनाभराचा विचार केला तर डाळींच्या किंमतीत 20 रुपयांची वाढ झालीय. तसेच हरभरा आणि मसूर डाळीच्या दरातही वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
कोणत्या फळात किती रुपयांची वाढ झाली?
डाळीबरोबरच द्राक्ष, सफरचंद, पपई आणि केळीच्या दरात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. द्राक्षाच्या दर हा 80 रुपये प्रतिकिलोवरुन 120 रुपये प्रतिकिलोवर पोहोचला आहे. तब्बल किलोमागे द्राक्ष 40 रुपयांनी महाग झाली आहे. तसेच पूर्वी पपई किंमतत ही 50 प्रतिकिलो होती, ती आता 90 रुपये किलोवर पोहोचली आहे. तर 50 रुपये डझनने मिळणारी केळी ही 70 ते 80 रुपयांवर गेली आहे. त्यामुळं सर्वसामान्यांचं बजट कोलमडल्याची चर्चा सुरु आहे.
महत्वाच्या बातम्या: