Petrol Diesel Price : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol Diesel Price) घरसण होणार असल्याच्या बातम्या गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. पण खरच पेट्रोल डिझेलच्या दरात घसरण होणार का? याबाबतची माहिती ICRA ने दिलेल्या अहवाल (Report) समोर आली आहे. दरम्यान, सध्या कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण झाली आहे. तसेच पेट्रोलियम कंपन्यांच्या नफ्यात सुधारणा झाल्याचे या अहवालातून सांगण्यात आले आले आहे. यामुळं सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांना पेट्रोल आणि डिझेलच्या किमती प्रतिलिटर 2 ते 3 रुपयांनी कमी करण्याची शक्यता आहे.
अहवालात नेमकं काय सांगितलंय?
रेटिंग एजन्सी ICRA ने म्हटले आहे की, भारताने आयात केलेल्या कच्च्या तेलाची किंमत सप्टेंबरमध्ये सरासरी 74 अमेरिकन डॉलर प्रति बॅरल होती, जी मार्चमध्ये 83-84 अमेरिकन डॉलर प्रति बॅरल होती. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मागील वर्षी 2 रुपयांनी कपात करण्यात आली होती. भारतीय पेट्रोलियम विपणन कंपन्यांसाठी (OMCs) ऑटोमोटिव्ह इंधनाच्या किरकोळ विक्रीवरील मार्केटिंग मार्जिन अलिकडच्या आठवड्यात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने सुधारले आहे असे ICRA ने एका नोटमध्ये म्हटले आहे. कच्च्या तेलाच्या किमती सध्याच्या पातळीवर स्थिर राहिल्यास किरकोळ इंधनाच्या किमती कमी होण्यास वाव आहे, असा रेटिंग एजन्सीचा अंदाज आहे.
दोन वर्षापासून इंधानाच्या दरात कोणतेही बदल नाहीत
लोकसभा निवडणुकीच्या काळात देशात पेट्रोल डिझेलच्या दरात झालेली कपात वगळता गेल्या दोन वर्षापासून इंधानाच्या दरात कोणतेही बदल झाले नाहीत. त्यामुळं महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलचे दर कमी होतील का? असा प्रश्न विचारला असता अधिकाऱ्याने यावर बोलणे टाळले. पण दर कमी होमार नाहीत, असे म्हणता येणार नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे. भारत हा जगातील सर्वांत मोठा तिसरा तेल आयात करणारा देश आहे. त्यामुळे तेलाची गरज भागवण्यासाठी भारत 87 टक्के विदेशी स्त्रोतांवर अवलंबून आहे. अशा स्थितीत भारत आता भारत कच्च्या तेलाची जास्तीत जास्त खरेदी करण्यास तयार आहे. डिसेंबर 2021 नंतर प्रथमच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. मात्र, एक दोन दिवसानंतर पुन्हा तेलाच्या दरात वाढ झाल्याचे दिसून आली आहे. सध्या दरात चढ उतार सुरुच आहे. त्यामुळं देशात पेट्रोल डिझेलचे दर कमी होणार का? याबाबत प्रश्न उपस्थित केले जातायेत.
महत्वाच्या बातम्या: