kesar prices : भारतीय केशरच्या (Indian saffron) किंमतीत प्रचंड वाढ झालीय. अचानक दरात वाढ झाल्यानं सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. 1 किलो भारतीय केशरसाठी तब्बल 4.95 लाख रुपये मोजावे लागत आहेत. दरम्यान, भारतीय केशरचा एवढा दर वाढण्याते नेमके कारण काय? याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात.  


इराणमधून येणाऱ्या केशरच्या पुरवठ्यात मोठी घट 


पश्चिम आशियातील भू-राजकीय तणावामुळे इराणमधून केशरच्या पुरवठ्यात मोठी घट झाली आहे. त्यामुळे भारतीय शेतकरी आणि व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. तसेच जम्मू-काश्मीरमध्ये देखील केशरचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जाते. मात्र, यावर्षी तिथेही उत्पादनात मोठी मोठी घट झाली आहे.


भारतीय केशर उत्पादक आणि व्यापाऱ्यांना दिलासा 


दरम्यान, मिळालेल्आ माहितीनुसार, सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये भारतातील काही प्रसिद्ध मसाला कंपन्यांच्या मसाल्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. पण केशर हा भारतीय मसाला जगभर प्रसिद्ध झाला आहे. सध्या केशरची किरकोळ किंमत ही 4.95 लाख रुपये झाली आहे. पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या भू-राजकीय तणावामुळे इराणमधून केशराच्या पुरवठ्यात मोठी घट झाली आहे. त्यामुळे भारतीय केशर उत्पादक आणि व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. गेल्या काही महिन्यात घाऊक बाजारात केशरच्या किंमती 20 टक्क्यांनी तर किरकोळ बाजारत 27 टक्क्यांनी वाढल्या आहेत.


इराणमध्ये दरवर्षी सुमारे 430 टन केशर उत्पादन होते


तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार चांगल्या दर्जाचे भारतीय केशर हे घाऊक बाजारात प्रतिकिलो 3.5 ते 3.6 लाख रुपये प्रतिकिलो दरानं विकले जाते. पश्चिम आशियामध्ये संघर्ष सुरु होण्यापूर्वी केशरची किंमती ही 3 लाख रुपयापर्यंत होती. आता मात्र, त्यामध्ये मोठी वाढ झालीय. 4.95 लाख रुपयापर्यंत केशर गेले आहे. इराणमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात केशरचे उत्पादन होते. इराणमध्ये दरवर्षी सुमारे 430 टन केशर उत्पादन करतो. ते जागतिक उत्पादनाच्या 90 टक्के आहे. ये केशच त्याच्या खास चवीसाठी प्रसिध्द आहे. अन्नामध्ये, औषधामध्ये तसेच विविध प्रकारच्या सौंदर्यप्रसाधने हे केशर वापरले जाते. 


का वाढतायेत भारतीय केशरच्या किंमती?


सध्याच्या जागतिक स्थितीमुळं जागतिक बाजारपेठेत इराणचे केशर कमी प्रमाणत येतेय. त्यामुळं भारतीय केशरच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. भारत देखील इराणमधूनच केशर आयात करतो. भू-राजकीय तणाव सुरू झाल्यानंतर त्यातही घट झाली आहे. त्यामुळं दरात सातत्यानं वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आपल्याकडे काश्मीरचे केशर उत्तम दर्जाचे मानले जाते. भारत यूएई, यूएसए, ऑस्ट्रेलिया, नेपाळ आणि कॅनडा या देशांना केशरचा पुरवठा करतो. एक ग्रॅम केशरमध्ये 160 ते 180 फुलांपासून घेतलेले तंतू असतात. 


महत्वाच्या बातम्या:


63 वर्षी महिलेनं केला 'केशर लागवडीचा' यशस्वी प्रयोग; यूट्यूबच्या मदतीनं तंत्रज्ञानाचा वापर