Gold Silver Price Today: सोन्याची (Gold) खरेदी करणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. कारण सोन्याच्या दरात (Gold Price) घसरण सुरुच असल्याचे आजही पाहायला मिळालं. सोने 100 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त झाले आहे, तर दुसरीकडं चांदीच्या दरात (Silver Price) मात्र, वाढ झाल्याचे दिसून आले आहे. जाणून घेऊयात आज सोन चांदीचे दर काय आहेत.


या लग्नसराईत सोने खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये आज (16 फेब्रुवारी) सराफा बाजार सुरू होताच सोन्याच्या दरात पुन्हा घसरण झाली. 24 कॅरेट 10 ग्रॅम शुद्ध सोन्याबद्दल बोललो तर आज त्याची किंमत 110 रुपयांनी घसरुन 62250 रुपये झाली आहे. चांदीबद्दल बोलायचे झाले तर त्याची किंमतही किलोमागे 500 रुपयांनी वाढली आहे. कर आणि अबकारी करामुळं दररोज सोन्या-चांदीच्या किंमतीत चढ उतार होत असल्याचं चित्र दिसत आहे. 


वाराणसीच्या सराफा बाजारात आज 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 100 रुपयांनी घसरून 57050 रुपयांवर आला आहे. तर 15 फेब्रुवारीला त्याची किंमत 57150 रुपये होती. याआधी 14 फेब्रुवारीला त्याची किंमत 57750 रुपये होती. तर 13 फेब्रुवारीला त्याची किंमत 57850 रुपये होती. 12 फेब्रुवारीला त्याची किंमत तीच होती, तर 11 फेब्रुवारीला त्याची किंमत 58050 रुपये होती..


24 कॅरेट सोन्याच्या दरात 110 रुपयांची घसरण


22 कॅरेट सोन्या व्यतिरिक्त, जर आपण 24 कॅरेट 10 ग्रॅम शुद्ध सोन्याबद्दल बोललो तर शुक्रवारी त्याची किंमत 110 रुपयांनी घसरून 62250 रुपये झाली होती. तर 15 फेब्रुवारीला त्याची किंमत 62360 रुपये होती. वाराणसीचे सराफा व्यापारी रुपेंद्र सिंह यांनी सांगितले की, गेल्या 48 तासांत सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 700 रुपयांनी स्वस्त झाला आहे. भविष्यात त्याच्या किंमती आणखी घसरण्याची शक्यता आहे. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु आहे. या हंगामात मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी होत असते. अशातच दर कमी झाल्यामुळं सोन्याची खरेदी करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.


चांदीच्या दरात 500 रुपयांची वाढ


चांदीच्या दरात शुक्रवारी पुन्हा वाढ झाली आहे. चांदीच्या दरात 500 रुपयांनी वाढ होऊन 74500 रुपयांवर पोहोचले. याआधी 15 फेब्रुवारीला त्याची किंमत 74000 रुपये होती. तर 14 फेब्रुवारीला त्याची किंमत 75500 रुपये होती. त्याची किंमत 13 फेब्रुवारीलाही तीच होती. 12 फेब्रुवारीला चांदीची किंमत 75000 रुपये होती. तर 11 आणि 10 फेब्रुवारीलाही तीच होती. तर 9 फेब्रुवारीला त्याची किंमत 74500 रुपये होती.


महत्वाच्या बातम्या:


Nashik IT Raid : सोन्याची बिस्किटं, दागिने, रोख रक्कम आणि बरंच काही..! नाशिकमध्ये आयकर विभागाचा छापा, कोट्यवधी रुपयांचे घबाड हस्तगत