MCX Gold Silver Rate: सोन्या चांदीच्या दरात (Gold Silver Rate) सातत्यानं चढ उतार होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कधी सोन्याच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळत आहे. आज सोन्यासह चांदीच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळालं आहे. त्यामुळ खरेदीदारांच्या खिशाला झळ बसली आहे. बुधवारी देशांतर्गत बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ झालीय. चांदी 600 रुपयांनी तर सोन्याचा दर 150 रुपयांनी महागला आहे.
सद्या सोन्या चांदीचे दर काय?
मिळालेल्या माहितीनुसार आजे फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्या-चांदीच्या किमती वाढत आहेत. एमसीएक्सवर चांदीच्या किमतीत 600 रुपयांची मोठी वाढ दिसून येत आहे. त्यामुळं चांदीचा दर हा 96000 रुपये प्रति किलो झाला आहे. सोन्याच्या दरातही 100 रुपये प्रति 10 ग्रॅमची वाढ नोंदवली आहे. त्याची किंमत 72,200 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचली आहे. आज वायदे बाजारात चांदी कालच्या तुलनेत 641 रुपये प्रति किलोने महागली आहे. चांदी 96,089 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचली आहे. मंगळवारी चांदी 95,448 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती.
दरम्यान, दुसरीकडे चांदीप्रमाणेच सोनेही वायदे बाजारात महागले आहे. MCX वर कालच्या तुलनेत सोने 145 रुपये प्रति 10 ग्रॅमने महागले आहे. सोने 72,325 रुपयांवर पोहोचले आहे. तर काल ,सोन्याचा दर हा 72,180 रुपयांवर बंद झाला.
कोणत्या शहरात सोन्या-चांदीला किती दर?
दिल्ली- 24 कॅरेट सोने 73,910 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 97,700 रुपये प्रति किलो
चेन्नई - 24 कॅरेट सोने 73,910 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 1,02,200 रुपये प्रति किलो
पाटणा - 24 कॅरेट सोने 73,250 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 97,700 रुपये प्रति किलो
मुंबई - 24 कॅरेट सोने 73,200 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 97,700 रुपये प्रति किलो
कोलकाता - 24 कॅरेट सोने 73,200 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 97,700 रुपये प्रति किलो
जयपूर - 24 कॅरेट सोने 73,350 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 97,700 रुपये प्रति किलो
नोएडा - 24 कॅरेट सोने 73,350 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 97,700 रुपये प्रति किलो
लखनौ - 24 कॅरेट सोने 73,350 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 97,700 रुपये किलो दराने विकली जात आहे.
पुणे - 24 कॅरेट सोने 73,200 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 97,700 रुपये प्रति किलोग्रॅम
गुरुग्रामम - 24 कॅरेट सोने 73,350 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 97,700 रुपये प्रति किलो
दरम्यान, देशांतर्गत बाजारात सोन्या चांदीच्या दरात वाढ होत अताना दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या आणि चांदीच्या दरात वाढ होत आहे.
महत्वाच्या बातम्या: