Post Office scheme News: गेल्या काही दिवसांत शेअर बाजारात (Share Market) मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याने किरकोळ गुंतवणूकदारांचे (Investors) मोठे नुकसान झाले आहे. काही गुंतवणुकदारांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या 6 महिन्यांत किंवा वर्षभराच जी कमाई केली होती, ते सर्व पैसे गमावले आहेत. आकडेवारीनुसार, गेल्या एका महिन्यात गुंतवणूकदारांचे 40 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत आता अनेक लोक कमी जोखमीच्या ठिकाणी गुंतवणूक (Investment) करण्याचा विचार करत आहेत. जर तुम्हीही अशाच एखाद्या योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही एका सरकारी योजनेबाबतची माहिती पाहुयात.

  


केवळ व्याजातून 12 लाख रुपयांहून अधिक कमाई


ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही लहान बचत योजनांशी जोडलेली आहे. ही योजना पोस्ट ऑफिस अंतर्गत चालवली जाते. या योजनेंतर्गत केवळ व्याजातून 12 लाख रुपयांहून अधिक कमाई केली जाते. तसेच धोकाही नगण्य असतो. त्याचबरोबर या योजनेअंतर्गत कर सवलतीचा लाभही दिला जातो. यामध्ये गुंतवणुकीची कमाल मर्यादा 30 लाख रुपये आहे. कोणताही ज्येष्ठ नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतो. खरं तर, आम्ही बोलत आहोत ज्येष्ठ नागरिक बचत योजनेबद्दल, ज्या अंतर्गत तुम्ही लाखो रुपये कमवू शकता.


5 वर्षांसाठी ठराविक रक्कम गुंतवली जाते


पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही एक ठेव योजना आहे. यामध्ये 5 वर्षांसाठी ठराविक रक्कम गुंतवली जाते. ज्येष्ठ नागरिक या योजनेत जास्तीत जास्त 30 लाख रुपये गुंतवू शकतात, तर किमान गुंतवणुकीची मर्यादा 1000 रुपये आहे. सध्या SCSS वर 8.2 टक्के वार्षिक व्याज दिले जाते. व्याज तिमाही आधारावर सुधारित केले जाते.


कसे मिळेल 12 लाख रुपयांचं व्याज? 


जर तुम्ही या योजनेत वार्षिक 30 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला 5 वर्षांत 8.2 टक्के दराने 12,30,000 रुपये व्याज मिळेल. प्रत्येक तिमाहीत 61,500 रुपये व्याज म्हणून जमा केले जातील. अशा परिस्थितीत, 5 वर्षानंतर तुम्हाला एकूण 42 लाख 30 हजार रुपये मॅच्युरिटी रक्कम म्हणून मिळेल. जर तुम्ही या योजनेत 5 वर्षांसाठी 15 लाख रुपये जमा केले तर सध्याच्या 8.2 टक्के व्याजदरानुसार तुम्हाला 5 वर्षात केवळ व्याजातून 6 लाख 15 हजार रुपये मिळतील. व्याजाची तिमाही आधारावर गणना केल्यास, दर तीन महिन्यांनी 30,750 रुपये व्याज मिळेल. अशा प्रकारे 15 लाख रुपये आणि व्याजाची रक्कम जोडून एकूण 21 लाख 15 हजार रुपये मॅच्युरिटी रक्कम म्हणून प्राप्त होतील.


हा लाभ कोणाला मिळू शकतो? 


ज्येष्ठ नागरिक बचत योजनेअंतर्गत, 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची कोणतीही व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते. योजना 5 वर्षांनी परिपक्व होते. जर तुम्हाला या योजनेचे लाभ 5 वर्षांनंतरही चालू ठेवायचे असतील, तर ठेव रकमेच्या मॅच्युरिटीनंतर तुम्ही खात्याचा कालावधी तीन वर्षांसाठी वाढवू शकता. कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ SCSS मध्ये उपलब्ध आहे.


महत्वाच्या बातम्या: