Post office best saving schemes : पोस्ट ऑफिसमध्ये (Post office) लहान मुले आणि वृद्धांसाठी अनेक बचत योजना चालवल्या जात आहेत. यापैकी एक विशेष योजना गुंतवणूकदारांना केवळ व्याजाद्वारे लाखो कमावण्यास मदत करते. पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजनेच्या माध्यमातून तुम्ही चांगला नफा मिळवू शकता. या पंचवार्षिक योजनेत तुमचे पैसे सुरक्षित ठेवण्यासोबतच तुम्हाला मजबूत परतावाही मिळतो. यामुळे, ही लोकप्रिय रिटर्न योजनांपैकी एक आहे. 


पोस्ट ऑफिसच्या पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट या योजनेत पाच वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागते. गेल्या वर्षी 1 एप्रिल 2023 रोजी सरकारने पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीममधील व्याजदर 7 टक्क्यांवरून 7.5 टक्के केला होता. प्रत्येकाला त्यांच्या कमाईतील काही रक्कम वाचवायचो असतो. ते अशा ठिकाणी गुंतवायचे असतात की, जिथे त्यांचे पैसे सुरक्षित राहतील. तसेच त्यांना त्यावर उत्कृष्ट परतावा मिळू शकेल. या बाबतीत, पोस्ट ऑफिसद्वारे चालवल्या जाणार्‍या छोट्या बचत योजना आता खूप लोकप्रिय ठरत आहेत. पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट स्कीमबद्दल बोलायचे झाले तर, ते प्रचंड व्याज आणि उत्तम फायदे देखील देते. या योजनेतील गुंतवणुकीवर मिळणारे व्याज 7.5 टक्के आहे.


एप्रिलमध्ये व्याजदरात बदल 


एप्रिलमध्ये व्याजदरात बदल करण्यात आला आहे. छोट्या बचत योजनांचे (सरकारी लहान बचत योजना) व्याजदर सरकार दर तीन महिन्यांनी सुधारित करते. 1 एप्रिल 2023 रोजी ही पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट पाच कालावधीसाठी वर्ष सुधारित केले आहे. योजनेतील उपलब्ध व्याजदर 7 टक्क्यांवरुन 7.5 टक्के करण्यात आला आहे. या व्याजदरासह, ही पोस्ट ऑफिस योजना सर्वोत्तम बचत योजनांपैकी एक आहे. हमी मिळकतीमुळे ती गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय होत आहे.


गुंतवणूकदार वेगवेगळ्या कालावधीसाठी पोस्ट ऑफिसच्या या बचत योजनेत गुंतवणूक करता येते. या अंतर्गत 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष आणि 5 वर्षांसाठी पैसे जमा करता येतात. जर तुम्ही एका वर्षासाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला 6.9 टक्के व्याज मिळेल, तुम्ही 2 किंवा 3 वर्षांसाठी पैसे गुंतवले तर तुम्हाला 7 टक्के व्याज मिळेल आणि पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीममध्ये 5 वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास 7.5 टक्के व्याज मिळेल. मात्र, ग्राहकाची गुंतवणूक दुप्पट होण्यासाठी पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधी लागतो.


व्याजातून 2 लाखांपेक्षा जास्त कमाई होईल


समजा एखाद्या ग्राहकाने पाच वर्षांसाठी 5 लाख रुपयांची गुंतवणूक केली आणि त्याला 7.5 टक्के दराने व्याज मिळाले, तर या कालावधीत त्याला ठेवीवर 2,24,974 रुपये व्याज मिळेल.  गुंतवणूकीच्या रकमेसह एकूण रक्कम 7,24,974 रुपये होईल. म्हणजे त्यात गुंतवणूक करुन तुम्हाला लाखो रुपयांचे हमखास उत्पन्न मिळू शकते.


तुम्हाला कर सवलतीचा लाभही मिळतो


टाईम डिपॉझिट स्कीममध्ये, ग्राहकाला आयकर विभाग कायदा 1961 च्या कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ देखील दिला जातो. या बचत योजनेत एकल खाते किंवा संयुक्त खाते उघडता येते. 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलाचे खाते त्याच्या कुटुंबातील सदस्याद्वारे उघडता येते. यामध्ये किमान 1,000 रुपयांमध्ये खाते उघडता येते. ज्यामध्ये व्याजाचे पैसे वार्षिक आधारावर जोडले जातात.


महत्त्वाच्या बातम्या:


Investment Tips:  दिवाळीत 'या' योजनेत गुंतवणूक करा, निवृत्तीनंतर दरमहा मिळवा मोठा परतावा