Nirmala Sitharaman: देशातील महिलांना पाठबळ देण्यासाठी अनेक सरकारी योजना राबवल्या जात आहेत. याबाबतची माहिती खुद्द अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी दिली. लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य देणाऱ्या 'प्रधानमंत्री मुद्रा योजने' अंतर्गत महिला उद्योजकांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली. विशेषत: महिला उद्योजकांना सक्षम करण्यासाठी बँकांमार्फत कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली होती असे त्या म्हणाल्या. 'पीएम स्वानिधी से समृद्धी' कार्यक्रमांतर्गत लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.
स्वनिधी ते समृद्धी कार्यक्रम हा पीएम-स्वानिधी योजनेचा अतिरिक्त घटक आहे. यामध्ये योजनेचे पात्र लाभार्थी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सामाजिक-आर्थिक उन्नतीसाठी केंद्र सरकारच्या आठ योजनांमध्ये प्रवेश दिला जातो. आधार कार्ड मिळाल्यानंतर लाभार्थी बँक खाते उघडू शकतो. केंद्राकडून थेट त्याच्या खात्यात आर्थिक मदत पाठवली जाऊ शकते, ज्यामुळं लाभार्थी सक्षम होईल. 'मध्यस्थ' टाळू शकतो. यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रसिद्ध वक्तव्याचा संदर्भ दिला. केंद्राने लाभार्थ्याला 100 रुपये पाठवले तर त्याला केवळ 15 रुपयेच मिळतात, उर्वरित 85 रुपये ‘मध्यम आणि इतरांच्या’ खिशात जातात.
महिला स्वत:चा व्यवसाय सुरू करू शकतात
लहान व्यवसाय चालवणाऱ्या किंवा व्यवसाय सुरु करू इच्छिणाऱ्या महिला बँकेशी संपर्क साधू शकतात, ही या योजनेची महत्त्वाची बाब असल्याचे त्यांनी सीतारमण यांनी म्हटलं आहे. याशिवाय पीएम मुद्रा योजना योजनेतून कर्ज घेऊन तुम्ही तुमचे काम सुरू करू शकता. या योजनेचा लाभ घेणाऱ्या 100 लोकांपैकी 60 महिला असतील असेही सीतारामन म्हणाल्या.
महिलांना देणार प्राधान्य
पीएम मुद्रा योजनेंतर्गत महिलांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. बिगर-कॉर्पोरेट, बिगर कृषी लघु/सूक्ष्म उद्योगांना 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देण्यासाठी 8 एप्रिल 2015 रोजी प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरू करण्यात आली होती. मुद्रा योजना (पीएमएमवाय) च्या माध्यमातून विना गॅरंटी कर्ज मिळते. त्याचबरोबर या लोनसाठी कोणतेही प्रक्रिया शुल्क आकारले जात नाही. मुद्रा योजनेत (पीएमएमवाय) कर्ज परतफेडीचा कालावधी पाच वर्षापर्यंत वाढवला जाऊ शकतो. कर्ज घेणाऱ्यांना एक मुद्रा कार्ड मिळते, त्याच्या मदतीने उद्योगासाठी आवश्यक खर्च केला जाऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या: