PM Kisan samman Nidhi Yojana : देशातील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस आनंदाचा असणार आहे. कारण, आज पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan samman Nidhi Yojana) 16 वा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. सुमारे 9 कोटी शेतकरी कुटुंबांना या हप्त्याचा लाभ मिळणार आहे. दरम्यान, जर एखाद्या शेतकऱ्याच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झाले नाहीत? तर त्या शेतकऱ्यानं नेमकं काय करावं. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता मिळवण्याची नेमकी प्रक्रिया काय? जाणून घेऊयात याबाबतची सविस्तर माहिती एका क्लिकवर.
PM Kisan Yojana : PM Kisan Samman Nidhi | PM किसानचा हप्ता न मिळालेल्या शेतकऱ्यांनी काय करावं?
ज्या शेतकऱ्यांचा PM किसान योजनेचा 16 वा हप्ता जमा झाला होणार नाही, त्या शेतकऱ्यांनी जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच त्या शेतकऱ्यांनी त्यांच्या बँक खात्याची स्थिती तपासली पाहिजे. त्यांच्या खात्यावर पैसे वर्ग झालेत की नाहीत हे तपासावे. तुम्ही तुमच्या बँकेची वेबसाइट किंवा मोबाईल अॅप वापरु शकता. याशिवाय शेतकरी बांधवांनी त्यांच्या जवळच्या कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. तसेच शेतकरी बांधव पीएम किसान हेल्पलाइन क्रमांक 155261 वर संपर्क साधू शकतात. तुम्ही पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन तक्रार देखील करू शकता.
PM Kisan Yojana : PM Kisan Samman Nidhi | कशी कराल तक्रार दाखल?
सर्वप्रथम तुम्हाला PM किसान वेबसाइटवर जाऊन लॉग इन करा (https://pmkisan.gov.in/)
त्यानंतर रजिस्टर कंप्लेंट पर्यायावर क्लिक करा
त्यानंतर तुमची तक्रार लिहा
तक्रारीसोबत तुमच्या कागदपत्रांच्या प्रती जोडा
तुमच्या तक्रारीत तुमचे नाव, पत्ता, बँक खाते क्रमांक आणि मोबाईल क्रमांक समाविष्ट करा
शेवटी शेतकरी बांधवांनी सबमिट बटणावर क्लिक करावे.
दरम्यान, ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ईकेवायसी केलेले नाही. तसेच अर्ज भरताना तुमचे नाव, वडिलांचे नाव, बँक खाते तपशील किंवा इतर कोणतीही चूक झाली असल्यास, तुम्ही या योजनेच्या लाभापासून वंचित राहाल. त्यामुळं तुम्ही लवकरात लवकर ईकेवायसी करुन घ्यावी. तसेच काही अपूर्ण माहिती असल्यास ती माहिती पूर्ण करावी. म्हणजे तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल.
PM Kisan Yojana : एकाचवेळी राज्य आणि केंद्राचे मिळून 6000 रुपये जमा होणार
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते आज पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे. राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एकाचवेळी राज्य आणि केंद्राचे मिळून 6000 रुपये जमा होणार आहेत. पीएम किसान योजनेचे 2000 रुपये तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता मिळून 4000 रुपये असे एकुण 6000 रुपये राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत.
महत्वाच्या बातम्या:
दिलासादायक! PM किसानचा 16 हप्ता आज जमा होणार, राज्यातील शेतकऱ्यांनी मिळणार 6000 रुपये