Ritha Farming : अलीकडच्या काळात शेतकरी (Farmers) विविध पिकांची प्रयोगशील शेती करत आहे. या शेतीतून लाखो रुपयांचा नफा करत आहेत. एक अशीच नफा मिळवून देणारी शेती म्हणजे रिठा झाडांची (Ritha Farming ) लागवड. रीठा ही एक उपयुक्त वनस्पती आहे. रिठा झाडाचे नाव Sapindus mucorossi आहे. रीठाचा उपयोग साबण आणि शॅम्पू सारखी सौंदर्य उत्पादने बनवण्यासाठी केला जातो. तसेच विविध औषधे तयार करण्यासाठी देखील या वनस्पतीचा वापर केला जातो. या झाडांच्या लागवडीतून एका एकरात शेतकऱ्यांना 10 लाख रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. 


रीठा ही एक उपयुक्त वनस्पती आहे. ही वनस्पती पंधराशे मीटर उंचीवर वाढते. प्रथण त्याची रोपवाटिका तयार केल्यानंतर त्याची लागवड करता येते. एकदा झाडाची वाढ झाली की त्याला सिंचनाची गरज भासत नाही. हे कोणत्याही प्रकारच्या उपयुक्त जमिनीवर घेतले जाऊ शकते. त्याची फळे आणि बिया वापरतात. औषधी गुणामुळं या वनस्पतीची लागवड करून भरपूर नफा कमावता येतो. फलोत्पादन विभागाचे फार्मास्युटिकल युनिट देखील रिठाच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना तांत्रिक माहिती आणि कृषी प्रशिक्षण देत आहे.


रिठाचा वापर नेमका कशासाठी होतो? 


रिठाचा उपयोग साबण आणि शॅम्पू सारखी सौंदर्य उत्पादने बनवण्यासाठी केला जातो. परंतू तसेच विविध प्रकारची औषधे तयार करण्यासाठी देखील रिठाचा वापर केला जातो. या झाडांचा लागवड करण्यासाठी जास्त मेहनत करावी लागत नाही. मार्केट योग्यरित्या उपलब्ध असल्यास चांगला फायदा मिळू शकतो. 


रिठा केसांसाठी फायदेशीर 


रिठा केसांसाठी खूप फायदेशीर आहे, केस गळणे थांबवण्यासाठी आणि केस वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. रिठाचा वापर केसांचा रंग, शॅम्पू आणि कंडिशनर म्हणून केला जातो. रिठाची मॅकाडॅमिया आकाराची फळे सुकवली जातात. ज्याचा वापर साबण आणि डिटर्जंट बनवण्यासाठी केला जातो. दमा रुग्णांसाठी आणि नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी रिठा फायदेशीर आहे. याशिवाय मायग्रेनची लक्षणे कमी करण्यासाठी रिठा प्रभावी आहे. दम्याचा त्रास असल्यास रिठा बारीक करून त्याचा वास घ्यावा. रिठा फळ पाण्यात उकळून त्याचे कमी प्रमाणात सेवन केल्याने उलटी होऊन विष बाहेर पडते. 


रिठापासून किती कमाई ?


एका एकरात 100 रिठाची झाडे लावल्यास एका झाडापासून 100 किलोपर्यं रिठा तयार होतो. एक किलो रिठा 100 रुपये किलो दराने विकला जातो. त्यामुळं शेतकरी एका एकरातून 10 लाख रुपये सहज कमवू शकतो. एक झाड चार वर्षांत तयार होते. त्याला सिंचनाची आवश्यकता नसते. रिठाच्या शेतात वेगवेगळी पिके लावून तुम्ही पैसेही कमवू शकता. 


महत्वाच्या बातम्या:


खरबुजाची लागवड करा, तीन महिन्यात लाखो रुपये कमवा