नवी दिल्ली : सध्या भारतात कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव दिसून येत आहे. अशातच लॉकडाऊनमुळे कोरोनाच्या काळात सामान्य लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये गुरुवारी सलग 12व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्याचं दिसून आलं. देशाच्या राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीमध्ये पेट्रोल 6.55 रुपयांनी महागलं आणि डिझेलची किंमत 7.06 रुपये प्रति लीटरने वाढली आहे.
तेल कंपन्यांनी गुरुवारी दिल्लीमध्ये पेट्रोलच्या किंमतीत 53 पैसे आणि डिझेलमध्ये 64 पैशांची वाढ केली आहे. इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत वाढून क्रमशः 77.81 रुपये आणि डिझेलची किंमत वाढून 76.43 रुपये प्रति लीटर एवढी झाली आहे.
पाहा व्हिडीओ : सरकारी बँकांना खर्चात 20 टक्के कपात करण्याचे केंद्राचे निर्देश
आज दिल्लीत पेट्रोलचे दर 77.81 रुपये, तर डिझेलचे दर 76.43 रुपये झाले आहेत. तर, मुंबईत पेट्रोल 84.65 रुपये प्रति लिटर व डिझेल 74.91 रुपये प्रति लिटर एवढा आहे.
जाणून घ्या देशातील कोणत्या शहरात काय आहे दर?
शहर | पेट्रोल | डिझेल |
दिल्ली | 77.81 | 76.43 |
मुंबई | 84.66 | 74.93 |
चेन्नई | 81.32 | 74.23 |
कोलकत्ता | 79.59 | 71.96 |
नोएडा | 79.07 | 69.38 |
लखनऊ | 78.97 | 69.29 |
पाटणा | 81.30 | 74.25 |
सलग 12व्या दिवशी इंधन दरात वाढ
आंतराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणावर पडझड झाल्यानंतरही भारतीय लोकांच्या खिशाला आराम मिळालेला नाही. विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने सरकारकडे पेट्रोल आणि डिझेलचे वाढलेले दर मागे घेण्याची मागणी केली आहे. परंतु, गुरुवारी तेल मार्केटिंग कंपन्यांनी सलग 12व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये वाढ केली आहे.
दरम्यान, राज्यांमध्ये सेल्स टॅक्स आणि व्हॅट लावण्यात आल्यामुळे इंधनाच्या दरांवर परिणाम होतो. तेल कंपन्यां सध्या इंधन दरात दररोज दरवाढ करत आहेत. याआधी कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे देशात इंधनांचे दर सलग 82 दिवसांपर्यंत स्थिर होते. कंपन्यांनी दररोज इंधन दरवाढ करण्याचा नियम काही दिवसांसाठी स्थगित केला होता.
महत्त्वाच्या बातम्या :
झोमॅटो 13 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार; तर सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतनात 50 टक्के कपात
अमेरिकी कंपनी ‘सिल्वर लेक’ची जिओमध्ये 5,656 कोटींची गुंतवणूक
Facebook | रिलायन्स जिओमधील 9.99 टक्के भागभांडवल फेसबुक विकत घेणार