Petrol Diesel Price Today : अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीमुळे बँकिंग संकट आणि जागतिक मंदी चाहूल लागल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत (Crude Oil) सातत्याने घसरण होताना दिसत आहे. आजही कच्च्या तेलाच्या किमतीत चढउतार कायम आहे. जेथे WTI कच्च्या तेलाच्या किमतीत 0.06 टक्क्यांची किंचित घसरण झाली आहे. दरम्यान, ब्रेंट क्रूड ऑइलचे भाव स्थिर आहेत. डब्ल्यूटीआय कच्चे तेल प्रति बॅरल 68.31 डॉलर आणि ब्रेंट क्रूड तेल प्रति बॅरल 74.70 डॉलरवर व्यापार करत आहे. कच्च्या तेलाच्या किमतीचा परिणाम इंधन दरावर होत असतो. कच्च्या तेलाच्या किमतीवरूनचं पेट्रोलियम कंपन्या दर जारी करतात.
Petrol Diesel Price Today : पेट्रोल आणि डिझेलचे दर काय?
कच्च्या तेलाच्या किमतीतील चढउताराचा परिणाम आज देशातील प्रमुख शहरांमधील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर झालेली नाही. आजही देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. चारही महानगरांमध्ये तसेच इतर अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दरात कोणताही बदल झाले नाही. देशातील 22 मे नंतर पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.
देशातील तेल कंपन्या दररोज सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करतात. आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दर जाहीर करण्यात आलेले असून त्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नईसह विविध शहरांतील इंधनाचे दर जाणून घ्या.
Petrol Diesel Price Today : चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर
- दिल्ली - पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
- चेन्नई - पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
- मुंबई - पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
- कोलकाता - पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
Petrol Diesel Price Today : तुमच्या शहरातील इंधनाचे दर
- पुणे : पेट्रोल 106.69 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.18 रुपये प्रति लिटर
- नागपूर : पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
- नाशिक : पेट्रोल 106.12 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.64 रुपये प्रति लिटर
- कोल्हापूर : पेट्रोल 106.63 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.16 रुपये प्रति लिटर
- औरंगाबाद : पेट्रोल 107.04 रुपये, डिझेल 93.53 रुपये प्रति लिटर
कच्च्या तेलाच्या घसरणीची दोन मुख्य कारणे
कच्च्या तेलाच्या किमती घसरण्यामागे दोन मुख्य कारणे असल्याचं सांगण्यात येत आहे. तेलाचा साठा लक्षणीय वाढला असून रशियामधून क्रूड बाजारात आणले जात आहे. दुसरीकडे अमेरिकेतील बँकिंग व्यवस्था संकटात आल्यामुळे जगात मंदीची भीती वाढली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
जगाची वाटचाल मंदीच्या दिशेने? कच्च्या तेलाची किंमत 75 डॉलरच्या खाली, 2021 नंतर नीच्चांकी पातळीवर