Petrol-Diesel Price Today 9th January 2023: भारतीय तेल कंपन्यांनी देशात पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. आजही देशात इंधन दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या देशातील चार प्रमुख महानगरांमध्ये शहरांमध्ये आज पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol-Diesel Price Today) स्थिर आहेत. तर दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरांत आज पुन्हा काहीशी वाढ पाहायला मिळत आहे. असं असलं तरीही, कच्च्या तेलाचे दर (Crude Oil) मात्र प्रति बॅरल 80 डॉलरच्या खाली आहेत.


आजचे कच्च्या तेलाचे दर 


आज जर आपण कच्च्या तेलाच्या किमतींवर नजर टाकली तर त्यात वाढ दिसून येत आहे. आज कच्च्या तेलाचे दर वाढूनही ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 80 डॉलरपेक्षा कमी आहे. आज ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 79.11 डॉलर इतकी आहे आणि WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल 74.24 डॉलर इतकी आहे.


मे महिन्यापासून आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil Price) किमतीत विक्रमी घसरण होत असताना सर्वांच्या नजरा देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीकडे लागल्या होत्या. पेट्रोल (Petrol) -डिझेलच्या (Diesel) किमतींत घट होणार का? याकडे सर्वसामान्यांचंही लक्ष लागलं होतं. पण आजही भारतील तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. 


हिमाचल प्रदेशात डिझेल 3 रुपयांनी महाग


हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh News) डिझेलच्या दरांत (Diesel Price) वाढ झाली आहे. सुखू सरकारनं (Sukhvinder Singh Sukhu) डिझेलच्या किमतीवर व्हॅट वाढवला आहे. हिमाचलमध्ये, (Himachal Pradesh CM Sukhvinder Singh Sukhu) सुखू सरकारनं डिझेलवरील व्हॅटमध्ये 3 रुपयांची वाढ केली आहे, त्यानंतर आता हिमाचल प्रदेशात डिझेलची किंमत 83.02 रुपये प्रति लिटरवरून थेट 86.05 रुपये प्रति लिटर झाली आहे. तर पेट्रोल 95.07 रुपयांनी 0.55 रुपयांनी स्वस्त विकलं जात आहे. तर महाराष्ट्र, केरळ, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि उत्तराखंड या राज्यांमधील काही शहरांमध्ये इंधन दरांत किरकोळ बदल झालेले आहेत. 


Petrol Diesel Price Today : देशांतील मोठ्या शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर



  • दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर 

  • मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

  • कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा 92.76 रुपये प्रति लिटर 

  • चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर


Petrol Diesel Price Today : राज्यात कोणत्या शहरात किती दर? 



  • नागपूर : पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर

  • पुणे : पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर 

  • कोल्हापूर : पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर

  • औरंगाबाद : पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 रुपये प्रति लिटर 

  • परभणी : 109.45 रुपये प्रति लिटर, डिझेल 95.81 रुपये प्रति लिटर

  • नाशिक : पेट्रोल 106.77 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर


Petrol Diesel Price Today : तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती जाणून घ्या


इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.


इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.






पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).