Fuel Price : देशातील इंधन दरवाढीमुळे सामान्यांच्या खिशावर ताण येत आहे. आज देशातील तेल कंपन्यांनी आपले नवीन दर जाहीर केले आहेत. देशातील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असून इंधन कंपन्यांनी कोणतीही दरवाढ केली नाही. एक आठवड्यापूर्वी केंद्र सरकारने कर केले होते. त्यानंतर देशातील इंधन दरात घट झाली. काही राज्यांमध्ये पेट्रोलचा दर 100 रुपयांखाली आले आहेत.
कच्च्या तेलाच्या दरात वाढ
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढ झाली आहे. WTI क्रूड ऑइलच्या 0.98 डॉलरने वाढ झाली आहे. कच्च्या तेलाचे दर 115.1 डॉलर प्रति बॅरल दरावर व्यवहार करत आहे. ब्रेंट क्रूड ऑइलच्या दरात 2.03 डॉलरने वाढ झाली आहे. ब्रेंट क्रूड ऑइलच्या दरात 119.4 डॉलर प्रति बॅरल इतका दर झाला.
देशातील महानगरांत पेट्रोल-डिझेलचा दर काय?
देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत पेट्रोलचा दर 111.35 रुपये तर डिझेलचा दर 97.28 रुपये प्रतिलिटर आहे. तर राजधानी असलेल्या दिल्लीत 1 लिटर पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आणि 1 लिटर डिझेलची किंमत 89.62 रुपये आहे. कोलकात्यात पेट्रोलची किंमत 106.03 रुपये आहे तर डिझेलची किंमत 92.76 रुपये प्रति लीटर आहे. त्याच वेळी, चेन्नईमध्येही पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे.
राज्यातील इतर शहरांतील दर काय?
महाराष्ट्रातील मुंबई शहरात गुरुवारी पेट्रोलचा दर 111.35 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 97.28 रुपये प्रति लिटर आहे. तसेच, बृहन्मुंबईमध्ये, पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.53 रुपये आणि डिझेलचा दर 97.45 रुपये प्रति लिटर आहे. आज पुण्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.88 रुपये तर डिझेलचा दर 95.37 रुपये प्रति लिटर आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 111.74 रुपये तर डिझेलचा दर 96.20 रुपये प्रति लिटर आहे. नागपुरात पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.08 रुपये तर डिझेलचा दर 95.59 रुपये प्रति लिटर आहे. कोल्हापुरात पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.44 रुपये तर डिझेलचा दर 95.94 रुपये प्रति लिटर आहे.