Petrol Diesel Price News : देशातील सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारी आणि मोठी बातमी समोर आली आहे. लवकरच पेट्रेल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price) कमी होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होणार याची चर्चा सुरु आहे. दरकपातीच्या मुद्यावर आता सरकारनं (Govt) प्रतिक्रिया दिली आहे. डिझेल आणि पेट्रोलच्या दरात होळीनंतर कपात होण्याची शक्यता आहे.
पेट्रोलियम सचिवांनी काय दिली माहिती?
देशातील तेल विपणन कंपन्या (OMCs) इंधनाच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतील असं मत पेट्रोलियम सचिव पंकज जैन यांनी व्यक्त केले. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती आणखी काही काळ नरम राहिल्यास सरकारी तेल कंपन्या याबाबत निर्णय घेऊ शकतात. दरम्यान, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL), हिंदुस्थान पेट्रोलियम (HPCL) आणि भारत पेट्रोलियम (BPCL) या देशातील तीन सरकारी तेल कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीनुसार दर पंधरवड्याला डिझेल आणि पेट्रोलच्या किमतींचा आढावा घेतात.
6 महिन्यापूर्वी दरात झाली होती कपात
गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे की, सरकार पुन्हा एकदा डिझेल आणि पेट्रोलच्या दरात कपात करू शकते. डिझेल आणि पेट्रोलच्या दरात शेवटची कपात ही 14 मार्च 2024 रोजी झाली होती. त्यावेळी डिझेल आणि पेट्रोलचे दर प्रतिलिटर 2 -2 रुपयांनी कमी झाले होते. म्हणजेच डिझेल आणि पेट्रोलच्या किमतीत शेवटची कपात होऊन 6 महिने झाले आहेत. या 6 महिन्यांत इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
सणासुदीच्या काळात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात शेवटची कपातसहा महिन्यापूर्वी झाली होती. यंदा होळी हा सण 25 मार्च रोजी साजरा करण्यात आला. देशात सणासुदीला सुरुवात होणार आहे. पुढील महिन्यापासून उत्सवांची मालिका सुरू होणार आहे. पुढील महिन्याच्या 12 तारखेला दसरा, तर 31 ऑक्टोबरला दिवाळी आहे.
कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या
विदेशी बाजारात कच्च्या तेलाचा दर सध्या तीन वर्षांतील नीचांकी पातळीवर आहे. गुरुवारी, ब्रेंट क्रूड 1.36 टक्क्यांच्या वाढीसह प्रति बॅरल 71.57 डॉलरवर व्यापार करत आहे आणि वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट 1.43 टक्क्यांच्या वाढीसह प्रति बॅरल 68.27 डॉलरवर व्यापार करत आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला, मंगळवारी ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 70 डॉलरच्या खाली गेली होती. डिसेंबर 2021 नंतर ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा कच्च्या तेलाची किंमत 70 डॉलरच्या खाली गेली आहे.
महत्वाच्या बातम्या:
तुमच्या वाहनात AC आहे का? 1 तास AC चालवायला किती पेट्रोल लागते? जाणून घ्या सविस्तर माहिती एका क्लिकवर