Petrol Diesel Price Today 7th November 2022: देशातील सहा राज्यातील सात पोटनिवडणुकांचे निकाल रविवारी जाहीर झाले. पोटनिवडणुकांच्या निकालानंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल होतील अशी अटकळ व्यक्त करण्यात येत होती. तर, दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घसरण (Crude Oil Price) झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज इंधन कंपन्यांनी आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर (Petrol Diesel Price) केले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झाला नाही. 


आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घसरण आज घसरण झाल्याचे दिसून येत आहे. सोमवारी सकाळी ब्रेंट क्रूड ऑईलचा दर हा 97.36 डॉलर प्रति बॅरल इतका होता. तर, WTI क्रूड ऑईलचा दर 91.22 डॉलर प्रति बॅरल इतका होता. मागील काही दिवसांपासून कच्च्या तेलाचे दर वधारले होते. ब्रेंट क्रूड ऑईलचा दर हा 100 डॉलर प्रति बॅरलजवळ पोहचला होता. आज कच्च्या तेलाच्या दरात घसरण दिसून आली आहे. 


इंडियन ऑईल कंपनीने सकाळी जारी केलेल्या नव्या दरानुसार, देशातील चार प्रमुख महानगरात पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल झाला नाही. देशात 22 मे रोजी इंधन दरात बदल झाला होता. हा बदल ही केंद्र सरकारने उत्पाद शुल्कात कपात केल्याने झाला होता. तर, जुलै महिन्यात महाराष्ट्र सरकारने व्हॅट करात कपात केल्याने पेट्रोल, डिझेलच्या दरात बदल झाला होता.


देशातील प्रमुख महानगरात पेट्रोल-डिझेलचा दर


> दिल्ली: पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर 
> कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा 92.76 रुपये प्रति लिटर 
> चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
> मुंबई: पेट्रोलचा दर 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर


राज्यातील प्रमुख शहरातील पेट्रोल-डिझेलचा दर


> नागपूर: पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
> पुणे: पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर 
> कोल्हापूर: पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
>औरंगाबाद: पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 प्रति लिटर 


असे पाहा पेट्रोल, डिझेलचे दर 


जर बीपीसीएलचे (BPCL) ग्राहक असाल तर पेट्रोल-डिझेलची किंमत तपासण्यासाठी RSP <डीलर कोड> लिहा आणि 9223112222 या क्रमांकावर पाठवा. दुसरीकडे, HPCL ग्राहक HPPRICE <डीलर कोड> लिहून 9222201122 या क्रमांकावर पाठवतात. दुसरीकडे, इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> लिहून 9224992249 या क्रमांकावर पाठवतात. त्यानंतर तुम्हाला आजच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीची माहिती मेसेजद्वारे मिळेल.