Petrol Diesel Price Today: महागाईचा सामना करणाऱ्या सामान्यांना कोणताही आजही फारसा दिलासा मिळाला नाही. देशातील इंधन कंपन्यांनी आजचे पेट्रोल, डिझेलचे दर जाहीर (Petrol Diesel Price) केले आहेत. पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल झाला नाही. पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, ग्राहकांना कोणताही दिलासा इंधन कंपन्यांनी दिला नाही.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात चढ-उतार सुरू (Crude Oil Price) आहे. ब्रेंट क्रूड ऑईलचा दर हा प्रति बॅरल 98.57 डॉलर इतका आहे. तर, WTI क्रूड ऑईलचा दर 92.61 डॉलर प्रति बॅरल इतका आहे. तेल उत्पादक देशांनी कच्च्या तेलाच्या उत्पादनात कपात केल्याने दर वधारले आहेत. जगाच्या एकूण मागणीपैकी जवळपास दोन टक्के इतकी ही उत्पादन कपात आहे.
राज्यातील प्रमुख शहरातील पेट्रोल-डिझेलचा दर
> नागपूर: पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
> पुणे: पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर
> कोल्हापूर: पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
>औरंगाबाद: पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 प्रति लिटर
देशातील प्रमुख महानगरात पेट्रोल-डिझेलचा दर
> दिल्ली: पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
> कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा 92.76 रुपये प्रति लिटर
> चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
> मुंबई: पेट्रोलचा दर 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
मागील पाच महिन्यांपासून देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. मे महिन्यात केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्यानंतर जुलै महिन्यात राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलवरील करात कपात केली होती. त्यानंतर पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.
तुमच्या शहरांतील दर कसे पाहाल?
तुम्ही जर बीपीसीएलचे (BPCL) ग्राहक असाल तर पेट्रोल-डिझेलची किंमत तपासण्यासाठी RSP <डीलर कोड> लिहा आणि 9223112222 या क्रमांकावर पाठवा. दुसरीकडे, HPCL ग्राहक HPPRICE <डीलर कोड> लिहून 9222201122 या क्रमांकावर पाठवतात. दुसरीकडे, इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> लिहून 9224992249 या क्रमांकावर पाठवतात. त्यानंतर तुम्हाला आजच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीची माहिती मेसेजद्वारे मिळेल.