Petrol Diesel Price Today: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात चढ-उतार सुरू आहेत. मागील काही दिवसांपासून कच्च्या तेलाचे दर वधारत होते. त्यानंतर गुरुवारी कच्च्या तेलाच्या दरात किंचित घसरण दिसून आली. शुक्रवारी सकाळी, ब्रेंट क्रूड ऑईलचा दर 96.73 डॉलर प्रति बॅरल इतका होता. तर, डब्लूटीआय क्रूड ऑईलचा दर 88.71 डॉलर प्रति बॅरल इतका होता. 


कच्च्या तेलाचे दर 100 डॉलर प्रति बॅरल जवळ


तेल उत्पादक देशांची संघटना 'ओपेक' ने कच्च्या तेलाच्या दरातील घसरण रोखण्यासाठी उत्पादनात कपात करण्याची घोषणा केली. चीनमधून कमी झालेली मागणी आणि आर्थिक मंदीचे सावट यामुळे कच्च्या तेलाचे दर घसरू लागले होते. जवळपास महिनाभरापूर्वी कच्च्या तेलाचे दर 70 डॉलर प्रति बॅरलच्या इतके झाले होते. आता कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा एकदा दिसून येत आहे. 


आजचे पेट्रोल, डिझेलचे दर काय?


कच्च्या तेलाच्या दरात चढ-उतार सुरू असताना दुसरीकडे इंधन कंपन्यांनी आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर केले आहेत. देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. इंधन कंपन्यांनी ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कपात केली होती. 


देशातील प्रमुख महानगरात पेट्रोल-डिझेलचा दर 


> दिल्ली: पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर 
> कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा 92.76 रुपये प्रति लिटर 
> चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
> मुंबई: पेट्रोलचा दर 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर


राज्यातील प्रमुख शहरातील पेट्रोल-डिझेलचा दर 


> नागपूर: पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
> पुणे: पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर 
> कोल्हापूर: पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
>औरंगाबाद: पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 प्रति लिटर 


पेट्रोल-डिझेलचे दर कसे पाहाल? 


तुम्ही जर बीपीसीएलचे (BPCL) ग्राहक असाल तर पेट्रोल-डिझेलची किंमत तपासण्यासाठी RSP <डीलर कोड> लिहा आणि 9223112222 या क्रमांकावर पाठवा. दुसरीकडे, HPCL ग्राहक HPPRICE <डीलर कोड> लिहून 9222201122 या क्रमांकावर पाठवतात. दुसरीकडे, इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> लिहून 9224992249 या क्रमांकावर पाठवतात. त्यानंतर तुम्हाला आजच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीची माहिती मेसेजद्वारे मिळेल.