Petrol Diesel Price Today 26th Nov. 2022: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घसरण सुरू आहे. काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 100 डॉलरच्या जवळ पोहचले होते. मात्र, त्यानंतर आता, कच्च्या तेलाच्या दरात घसरण सुरू झाली आहे. कच्च्या तेलाच्या दरात घसरण सुरू असताना दुसरीकडे केंद्र सरकार आणि इंधन कंपन्यांनी भारतीय ग्राहकांना कोणताही दिलासा दिला नाही. इंधन कंपन्यांकडून आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर केले असून त्यात कोणताही बदल झाला नाही. तर, केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलवरील करातही कपात केली नाही. 


आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ऑईलचा दर 83.63 डॉलर प्रति बॅरल इतका होता. तर, WTI क्रूड ऑईलचा दर 76.28 डॉलर प्रति बॅरल इतका झाला आहे. जवळपास दोन टक्क्यांची घसरण कच्च्या तेलाच्या दरात झाली आहे. 


राज्यातील प्रमुख शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर


> नागपूर: पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
> पुणे: पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर 
> कोल्हापूर: पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
>औरंगाबाद: पेट्रोल 108 रुपये प्रति लिटर, डिझेल 95.96 प्रति लिटर 
> परभणी: पेट्रोल 109.41 रुपये प्रति लिटर, डिझेल 95.85 रुपये प्रति लिटर


देशातील प्रमुख शहरातील दर


> दिल्ली: पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर 
> कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा 92.76 रुपये प्रति लिटर 
> चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
> मुंबई: पेट्रोलचा दर 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर


185 दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर 


मे महिन्यांत केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील करात कपात केली होती. त्यामुळे पेट्रोल, डिझेलच्या दरात घट झाली होती. त्यानंतर देशातील पेट्रोल डिझेलच्या दरात कोणताही बदल झाला नाही. जुलै महिन्यात महाराष्ट्र सरकारने कर कमी करत जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तरीदेखील पेट्रोलचे दर 100 रुपयांहून अधिक आहे. 


आजचे इंधन दर कसे पाहाल?


इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.


पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).