Petrol Diesel Price Today 14th October 2022: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात चढ-उतार सुरू आहे. कच्च्या तेलाचे दर पुन्हा एकदा वधारले आहेत. शुक्रवारी, ब्रेंट क्रूड ऑईलचा दर 94.40 डॉलर प्रति बॅरल इतका झाला आहे. तर, WTI क्रूड ऑईलचा दर 88.87 डॉलर प्रति बॅरल इतका झाला आहे. त्यातच आज इंधन कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर केले (Petrol Diesel Price Today) आहेत. आजही इंधन दरात कोणताही बदल करण्यात आला नाही. 


काही दिवसांपूर्वी ब्रेंट क्रूड ऑईलचा दर 90 डॉलर प्रति बॅरल खाली घसरला होता. चीनमधून कमी झालेली मागणी आणि आर्थिक मंदीचे सावट याच्या परिणामी कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली होती. कच्च्या तेलाचे घसरणारे दर सावरण्यासाठी तेल उत्पादक देशांची संघटना 'ओपेक प्लस'ने पुढील महिन्यांपासून कच्च्या तेलाच्या उत्पादनात घट करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर कच्च्या तेलाच्या दरात मोठी उसळण दिसून आली. 


भारतातील इंधन कंपन्यांनी कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाल्यानंतरही पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात केली नाही. मे महिन्यात केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील करात कपात केली होती. त्यानंतर जुलै महिन्यात महाराष्ट्र सरकारने कर कमी केले. त्याच्या परिणामी राज्यात पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात झाली होती. त्यानंतर पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. 


देशातील प्रमुख महानगरात इंधन दर काय?


> दिल्ली: पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर 
> कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा 92.76 रुपये प्रति लिटर 
> चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
> मुंबई: पेट्रोलचा दर 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर


राज्यातील प्रमुख शहरात दर काय?


> नागपूर: पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
> पुणे: पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर 
> कोल्हापूर: पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
>औरंगाबाद: पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 प्रति लिटर 


मोबाईलवर पाहता येतील इंधन दर 


इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत)