Petrol Diesel Price in 02 December 2022: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत (Crude oil) वाढ झाली आहे. शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. त्याचा परिणाम आज देशातील अनेक शहरांमधील पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol Diesel Price) किरकोळ किमतींवर दिसून आला आहे. मात्र महानगरांतील किमती जैसे थेच आहेत. 


गेल्या 24 तासांत कच्च्या तेलाच्या किमतीत सुमारे 1.5 डॉलरची झेप घेतली आहे. ब्रेंट क्रूडची किंमत 1.46 डॉलरने वाढून प्रति बॅरल 86.88 डॉलरवर पोहोचली आहे. WTI मध्ये सुमारे 1 डॉलरची वाढ झाली आहे आणि ते प्रति बॅरल 81.19 डॉलरवर विकली जात आहे.


देशांतील मोठ्या शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर



  • दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर 

  • मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

  • कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा 92.76 रुपये प्रति लिटर 

  • चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर


तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारे तपासा


राज्यस्तरीय करांमुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर राज्यानुसार बदलतात. तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price) तुम्हाला एसएमएसद्वारे दररोज कळू शकतात. यासाठी इंडियन ऑइलच्या (IOCL) ग्राहकांना RSP कोड 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागेल. 


तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती जाणून घ्या, एका क्लिकवर 


इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.


इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.


पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 


महत्त्वाच्या इतर बातम्या: 


Mumbai Home Buying:  मुंबईत घर खरेदीकडे ओढा, मागील वर्षीच्या तुलनेत नोव्हेंबर महिन्यात 15 टक्क्यांची वाढ