Petrol and Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol and Diesel Price) दररोज भारतीय तेल कंपन्या जारी करतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतींच्या आधारावर या किमती ठरवल्या जातात. आज कच्च्या तेलाच्या किमतींत मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. WTI क्रूड ऑईलच्या किमतीत 0.53 टक्के (WTI Crude Oil Price) वाढ झाली आहे आणि ती प्रति बॅरल 77.55 डॉलरवर व्यापार करत आहे. तसेच, ब्रेंट क्रूड (Brent Crude Oil) ऑईलच्या किंमतीत 0.11 टक्क्यांनी मोठी वाढ नोंदवली गेली आहे आणि ते प्रति बॅरल 83.69 डॉलरच्या आसपास व्यवहार करत आहे. अशा परिस्थितीत या कच्च्या तेलाच्या किमतींचा आजच्या पेट्रोल (Petrol) -डिझेलच्या दरांवर (Diesel Price) परिणाम किती झाला आहे का? जाणून घेऊयात सविस्तर... 

आज देशातील चारही महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या चारही शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जुन्याच दरांवर कायम आहेत. तसेच, इतर काही शहरांमध्ये दरांमध्ये काही चढउतार नोंदवले गेले आहेत. 

Petrol Diesel Price Today : राज्यात कोणत्या शहरात किती दर? 

  • नागपूर : पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
  • पुणे : पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर 
  • कोल्हापूर : पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
  • औरंगाबाद : पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 रुपये प्रति लिटर 
  • परभणी : 109.45 रुपये प्रति लिटर, डिझेल 95.81 रुपये प्रति लिटर
  • नाशिक : पेट्रोल 106.77 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर

Petrol Diesel Price Today : देशांतील मोठ्या शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर

देशातील महानगरं पेट्रोल (प्रति लिटर) डिझेल (प्रति लिटर)
दिल्ली 96.72 रुपये 89.62 रुपये
मुंबई 106.31 रुपये 94.27 रुपये
कोलकाता 106.03 रुपये 92.76 रुपये
चेन्नई  102.63 रुपये 94.24 रुपये

Petrol Diesel Price Today : तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारे तपासा

राज्यस्तरीय करांमुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर राज्यानुसार बदलतात. तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्हाला एसएमएसद्वारे दररोज कळू शकतात. यासाठी इंडियन ऑइलच्या (IOCL) ग्राहकांना RSP कोड 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागेल.

पेट्रोल-डिझेलच्या किमती एका क्लिकवर जाणून घ्या 

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर पाहता येऊ शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) पाहता येतील.